‘एकात्मिक शेती’ कडे शेतकर्‍यांचे लक्ष

    दिनांक :03-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Integrated Farming : निसर्ग, वन्यप्राणी व अन्य संकटापासून मुक्ती आणि उत्पन्नात भर पाडण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारी आहे, असे सांगणारे स्टॉल चंद्रपुरात बुधवारपासून सुरू झालेल्या ‘चांदा अ‍ॅग्रो 2024’ येथे बघायला मिळाला. शेतकर्‍यांनी त्या ठीकाणी गर्दी केली होती. विशेषतः विदर्भातील शेतकरी एक पीक पद्धतीची शेती करतात. यातून कधी निसर्ग कोपतो, तर पूर, दुष्काळ आदी संकटांचा सामना करावा लागतो. निसर्गाने साथ दिलीच तर वन्यप्राणी हैदोस घालतात.
 
Integrated Farming
 
परिणामतः या भागातील शेतकर्‍यांवर दुष्काळाची छाया दिसते. अशावेळी Integrated Farming एकात्मिक शेती पद्धती शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारी आहे. ही पद्धत नवी दिल्ली परिसरात सुरू आहे. या पीक पद्धतीमुळे या भागातील शेतकरी सक्षम झाला आहे. याच पद्धतीचा अवलंब विदर्भातील शेतकर्‍यांनी करावा, यासाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना जागरूक केले जात आहे. शेतकर्‍यांनी या पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस. डी. घुले यांनी केले आहे.
 
 
पुंगनूर गाय ठरली आकर्षण
आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनीचे आकर्षण ठरत आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून, रंग पांढरा व भुरकट असतो. Integrated Farming वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. येथील शेतकर्‍यांनी ही गाय पाळून आपल्या उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन हैद्राबाद येथील गाय मालक राम व्ही. यांनी केले आहे. या गायीची जवळपास 1 लाख रूपये किंमत असल्याचेही त्यांनी सांगितले.