नागपूर,
Kanchan Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 5 ते 20 जानेवारी खासदार भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी 5 जानेवारीला वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात या होणार आहे. अयोध्या येथील भव्य मंदिरात श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने ‘श्रीराम भक्ती’ ही स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे. या निमित्ताने नागपूरकरांना पंधरा दिवस भक्तीचा मेळा अनुभवता येणार आहे. 6 विभागातून सुमारे 325 उत्साही महिला व पुरुष भजनी मंडळांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे.
स्पर्धक भजनी मंडळांना दोनपैकी एक गीत श्रीरामाचे, दुसरे गीत हे गोंधळ, जोगवा, अभंग यापैकी 1 अशी दोन गीते 10 मिनिटांच्या अवधीत सादर करायचे आहे. Kanchan Gadkari महाअंतिम फेरीसाठी सहा विभागांतून प्रत्येकी दोन अशा एकूण 12 भजनी मंडळांची निवड होईल. शुक‘वारी 5 जानेवारीला दक्षिण-पश्चिम विभागाच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे, राजीव हडप, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रगती पाटील, मंडळ अध्यक्ष रितेश गावंडे राहतील. खासदार भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून माया हाडे, श्रद्धा पाठक, सुरेश गुप्ता, रंजना गुप्ता, अभिजित मुळे, विश्वनाथ कुंभाळकर, भोलानाथ सहारे, वंदना कुलकर्णी, मोहन महाजन, अतुल सगुलले, लक्ष्मी राया, लता खापेकर, मनीषा दुबे, डॉ. अजय सारंगपुरे परिश्रम घेत आहेत.
स्पर्धा वेळापत्रक
पश्चिम विभागाची स्पर्धा 6 जानेवारीला रामनगरातील श्रीराम मंदिरात अजय संचेती यांच्या उपस्थितीत, Kanchan Gadkari पूर्व विभागाची स्पर्धा 7 जानेवारीला गुरुदेवनगर हनुमान मंदिरात आ. कृष्णा खोपडे यांच्या उपस्थितीत, दक्षिण विभागाची स्पर्धा 12 जानेवारीला आ. मोहन मते यांच्या उपस्थितीत, मध्य व उत्तर विभागाची स्पर्धा 12 व 13 जानेवीराला आ. विकास कुंभारे व आ. प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत श्री संत गुलाबबाबा आश्रमात होईल.