तभा वृत्तसेवा
अमरावती,
Amravati Gaukumbh : मनुष्यप्राणी, जनकल्याण, विश्वकल्याण यांच्यासाठी आतापर्यंत अनेक महाकुंभ व सहस्रचंडी यज्ञांचे आयोजन करण्यात आले. परंतु राष्ट्रमाता अशी मान्यता मिळावी, या उद्देशाने गौमातेसाठी राज्यातील पहिला महाकुंभ अमरावती जिल्ह्याच्या केकतपुर येथे भरवला जाणार आहे. हा महाकुंभ व सहस्रचंडी यज्ञ आगामी 15 ते 21 फेब्रुवारी या काळात होईल. त्यासाठीची जय्यत तयारी सुरु असल्याचे महाराष्ट्राचे गौदूत संत माधवदास महाराज यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाकुंभासाठी चारही पिठाचे शंकराचार्य, देशभरातील संत-महंत आणि Amravati Gaukumbh गौमातेसाठी झटणार्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, असेही यावेळी सांगण्यात आले. अमरावती-मोर्शी रस्त्यावरील केकतपुर येथे सिद्ध बाल हनुमान संस्था आणि लक्ष्मीनारायण गौधाम आहे. या गोधामच्या परिसरात 100 एकर जागेत हा गौकुंभ व सहस्रचंडी महायज्ञ होणार आहे. गौमातेला राष्ट्रमातेची मान्यता मिळवून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून देशभर चळवळी सुरु आहेत. वेळोवेळी त्यासाठी आंदोलनेही केली गेली. त्याचेच फळ म्हणून शासनाने गोहत्याबंदी कायदा केला. परंतु, त्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने देशभर अनर्थ सुरु आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान Amravati Gaukumbh गौमातेला राष्ट्रमातेची मान्यता मिळवून देण्यासाठीच्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून हा गौकुंभ भरवण्यात येत असल्याचे माधवदास महाराज यांनी सांगितले. गौमाता ही राष्ट्र, धर्म, संस्कृती व अखंड विकासाची जननी असून तिचे रक्षण ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. या गौकुंभाला श्री शारदापीठम् द्वारका, श्री ज्योतिर्मठ बद्रीकाश्रम, श्री श्रृंगेरीशारदापीठ व श्री गोवर्धनपीठ पुरी येथील शंकाराचार्य उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला संत माधवदास महाराज यांच्यासह जेष्ठ पत्रकारा प्रदीप देशपांडे, श्रीमंत शिवानंद पुरी महाराज, महंत सुरेशानंद गिरीजी, महंत प्रेमानंद गिरीजी व जगदंबनाथ महाराज, गोसेवक अजीत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
असे आहे आंदोलनाचे टप्पे
गौमातेला राष्ट्रमातेची Amravati Gaukumbh मान्यता मिळवून घेण्यासाठी 12 डिसेंबरला काशी (वाराणसी) येथे झालेल्या गौ संसदेत सर्व राज्यांच्या गोदुतांची नियुक्ती करण्यात आली आहे. 4 जानेवारीला वृंदावन येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 15 ते 23 जानेवारीदरम्यान दिल्ली येथे देशभरातील गौ विशेषज्ञांच्या बैठकी घेतल्या जातील. 30 जानेवारीला दिल्लीत पंतप्रधान, राष्ट्रपतींची तर प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाईल. 6 फेब्रुवारीला प्रयागराज तिर्थ येथे गौ संसदेचे आयोजन असून 10 ते 19 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीच्या रामलीला मैदानात अश्वमेघ महायज्ञ केला जाईल. 14 ते 20 फेब्रुवारीदरम्यान मध्यप्रदेशात नरसिंगपुर येथील नर्मदा नदीच्या ब्रम्हघाटावर गौरुद्र महायज्ञ तर 15 ते 21 फेब्रुवारीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील केकतपुर येथे महाकुंभ भरवला जाईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात 10 मार्चला दिल्लीत सर्व गौभक्त एकत्र येऊन 6 फेब्रुवारीच्या गौसंसदेतील रणनीतीनुसार पुढील आंदोलन करतील.