चीनसाठी हेरगिरी करणारा कबूतर!

    दिनांक :31-Jan-2024
Total Views |
मुंबई, 
A spying pigeon एकेकाळी दूरध्वनी किंवा टपाल सेवा नसताना एकमेकांना संदेश पाठवण्याचे साधन म्हणजे कबुतर. होय, चित्रपटांमध्येही कबुतरांनी पत्रे घेऊन जाण्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. पण, मुंबईतील कबुतराशी संबंधित असेच एक प्रकरण अतिशय गंभीर आहे. चिनी लोकांसाठी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका कबुतराला पकडले. त्याला आठ महिने स्पेशल सेलमध्ये ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
 
 
spay
चिनी लोकांनी हेरगिरीसाठी वापरल्याचा संशय असलेल्या एका कबुतराची आठ महिन्यांनंतर सुटका करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. A spying pigeon कबुतराला पशुवैद्यकीय रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आरसीएफ (नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर) पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, परळ परिसरात असलेल्या बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट पशुवैद्यकीय रुग्णालयाने सोमवारी या पक्ष्याला सोडण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, त्यानंतर  त्याला सोडण्यात आले.
गेल्या वर्षी मे महिन्यात चेंबूर उपनगरात आरसीएफ पोलिसांनी या कबुतराला पकडले होते. पोलिसांनी सांगितले की, पक्ष्याच्या पायाला दोन अंगठ्या बांधल्या होत्या, त्यापैकी एक तांब्याची आणि दुसरी ॲल्युमिनियमची होती. त्याच्या दोन्ही पंखाखाली चिनी लिपीत काही संदेश लिहिलेले होते. पोलिसांनी सांगितले की, आरसीएफ पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला होता, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर हेरगिरीचा आरोप वगळण्यात आला. A spying pigeon अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना कळले की, कबूतर तैवानमध्ये 'रेसिंग'मध्ये भाग घेत असे आणि अशाच एका कार्यक्रमादरम्यान ते उडून भारतात आले. पोलिसांकडून मंजुरी मिळाल्यानंतर हॉस्पिटलने कबुतराला सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, पक्ष्याची प्रकृती ठीक आहे.