संजिता मोहपात्रा नवीन सीईओ, आर. एल. पोकळे नवे आयजी

    दिनांक :31-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Amravati District : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावार संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर राज्य सरकारकडून बदल्या करण्यात येत आहे. मावळते सीईओ अविशांत पंडा यांच्या जागेवर संजिता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजिता विद्यमान स्थितीत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि. पालघर येथे विशेष प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे. अविशांत पंडा यांची नियुक्ती नागपूर येथे वस्त्रोउद्योग महामंडळाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी लवकरच आपआपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील, अशी माहिती मिळाली आहे.
 
Amravati District
31 जानेवारी Amravati District  अमरावती परिक्षेत्राच्या रिक्त असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर आर. एल. पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत नाईकनवरे यांची सदर पदावरून बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते आणि या पदाचा पदभार नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे होता. राज्याच्या गृहविभागाने बुधवारी रिक्त असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर आर. एल. पोकळे यांची नियुक्ती केली.