अर्थदुर्बलांसाठी अमृत योजना

    दिनांक :31-Jan-2024
Total Views |
 नागपूर,
Amrut Yojana आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन 'अमृत'चे विशेष कार्यकारी अधिकारी, व विभागीय पालक अधिकारी  उदय लोकापल्ली यांनी संवाद मेळाव्यात  केले आहे.
 
 

angha 
 
अमृत'च्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक येथे घेण्यात आली होती. अमृतच्या योजनांची माहीती देताना  लोकापल्ली यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेद वारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, Amrut Yojanaअर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याच बरोबर कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने इत्यादी योजना 'अमृत'मार्फत रबिवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगून सदर योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच भविष्यातील योजनांबाबतही थोडक्यात माहिती दिली.यावेळी विभागीय समन्वयक  देवदत्त पंडीत, व नागपूर शहर समन्वयक अमित यादव , पुर्व प्रमुख न्यायाधिश,(कौटुंबिक न्यायालय)  मीरा खडक्कार,   प्रा.अनघा आंबेकर आणि विविध क्षेञातील व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या. 
सौजन्य: अनघा आंबेकर,संपर्क मित्र