'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अंतर्गत महावाचन

    दिनांक :31-Jan-2024
Total Views |
बुलडाणा,
Mazi Shala : दहिद बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान'अंतर्गत दररोज अर्धा तास महावाचन राबवण्यात येत आहे. शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम गायकवाड तथा सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन करतात.
 
Mazi Shala
 
शालेय प्रांगणात बैठक रचना करून विद्यार्थ्यांचे स्वयं शिस्तीत वाचन घेतले जाते. विद्यार्थी मन लावून पुस्तके वाचतात. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयीची गरज शिक्षक वृंदांतर्फे समजावून सांगण्यात आली आहे. Mazi Shala शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन, शंभर दिवस वाचन अभियानही राबवण्यात आले. मुख्याध्यापक स्वतः आणि गणेश मुळे, जितेंद्र पालकर, सुनंदा गायकवाड, आशा खेत्रे, कावेरी जाधव, पल्लवी खरात, राजेंद्र गवई, जयश्री जाधव हे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांवर वाचनाचे संस्कार करत आहेत.