शिक्षक-कर्मचार्‍यांचे जीवनमान उंचावण्यात पतसंस्थेचे मोठे योगदान

सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांचे प्रतिपादन

    दिनांक :04-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
Suhas Gade :ज्यावेळी शिक्षक, कर्मचार्‍यांना राष्ट्रीयकृत बँकामधून कर्ज घेण्याठी मोठी कसरत करावी लागे अशावेळी जिल्हा परिषद शिक्षक कर्मचार्‍यांनी उभ्या केलेल्या पतसंस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता पतपुरवठा करुन कर्मचार्‍यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे Suhas Gade यांनी केले.
 
Suhas Gade
 
ते जिप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था 675 च्या आयोजित नवीन कार्यालय व स्थानांतरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थाध्यक्ष दिगंबर जगताप होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, यशदा पुणेच्या प्रशिक्षक निलिमा काळे, गटविकास अधिकारी संजय राठोड, महागाव पंसचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पुसदच्या गटशिक्षणाधिकारी सुशीला आवटे, महागावचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, विस्तार अधिकारी विनायक भांगे, अमित बोजेवार उपस्थित होते.
 
 
यावेळी काळबांडे, राठोड यांनी पतसंस्थेच्या सभासदांच्या हितासाठी सदैव तत्पर असणार्‍या पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी संस्थाध्यक्ष दिगंबर जगताप यांच्यावर विश्वास टाकून त्यांनी केलेल्या कार्याविषयी प्रशंसा करुन समायोचित भाषणे केली. व्दितीय सत्रात नीलिमा काळे यांनी ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन करून व्यक्तीमत्व विकासाचा संपूर्ण आढावा घेतला.
 
 
याप्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सारंग भटूरकर निर्मित ‘आचार्य शैक्षणिक दिनदर्शिके’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे विजय कन्नावार, आदर्श शिक्षक जगदीश जाधव, आदर्श सभासद गजानन कदम यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन वास्तुत स्थानांतरीत झालेल्या कार्यालयाला जिल्हा व तालुकास्तरावरील इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भेटी देऊन कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाल यांनी केले. प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव संतोष पद्मवार यांनी केले. कार्यक‘मासाठी सर्व संचालक मंडळ, सल्लागार समिती व उपक्रम समितीच्या सदस्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
मी एका शिक्षकाचा मुलगा असल्याने मला शिक्षकांविषयी प्रचंड आदर आहे. पतसंस्था शिक्षक कर्मचार्यांना आकस्मीत, तातडीचे व शिक्षणासाठीचे तसेच इतर कर्जांचा पुरवठा सभासदांना कशाप्रकारे करुन त्यांची गरज भागवतात हे जवळून पाहिले आहे.तशाच प्रकारे ही पतसंस्था देखिल पतपुरवठा करण्याबरोबरच सामाजिक उपक‘मात आघाडीवर असल्याचे दिसून येत असल्याने या पतसंस्थेचा जिव्हाळा आहे. 
: सुहास गाडे, Suhas Gade सहाय्यक जिल्हाधिकारी