उंबर्डा बाजार,
Yash Raut उंबर्डा बाजार चौकीचे हेकॉ विनोद महाकाळ यांचा मुलगा यश महाकाळ व यश राऊत याने ‘हायब्रिड अॅग्री रोबो’ चा विज्ञान प्रकल्प तयार करून तालुकास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून यश संपादन केले. तर त्याच्या प्रकल्पाची ची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ब्लू चिप कॉव्हेट कारंजा लाड येथील इयता १० वी मध्ये शिकत असलेल्या यश महाकाळ व यश राऊत या विद्यार्थ्यांनी मिळून ‘हायब्रिड अॅग्री रोबो’ बनवून स्पर्धेत सादरीकरण करून त्यांच्या प्रकल्पाला तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकावून त्यांच्या प्रोजेट ची जिल्हास्तरीय निवड झाल्याने यश महाकाळ व यश राऊत चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. Yash Raut या विज्ञान प्रकल्पाच्या यशाचे श्रेय त्यांनी आई वडिलासह मुख्याध्यापिका संगीता परळीकर, वर्गशिक्षक शारदा रोतोले, मार्गदर्शक शेकुवाले, चव्हाण यांना दिले.