मुंबई,
Wainganga-Nalganga project विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. Wainganga-Nalganga project वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असून, यातून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात पावसाळ्यातील पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा, तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्याद्धारे वळविण्यात येणार आहे.
यामुळे विदर्भाच्या ६ जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. या प्रकल्पासाठी ६२.५७ टीएमसी पाण्याची गरज असून, Wainganga-Nalganga project गोदावरी पाणी तंटा लवादाने गोसेखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी महाराष्ट्रास पूर्ण वापरास परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी ७५ टक्के विश्वासार्हतेने २९.२३ टीएमसी पाणी उपलब्ध असून, ६२.५७ टीएमसी पाणी ६३ टक्के विश्वासार्हतेस उपलब्ध आहे. Wainganga-Nalganga projectवैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील ६ जिल्ह्यातील सिंचन, घरगुती, औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार असल्याने पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून अवर्षणप्रवण व अनुशेषातील काही भागास पाणी देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.