‘विशुद्ध’ अंतर्गत घटक संस्थांचा संयुक्त ‘शारीरिक शिक्षण दिन’

    दिनांक :05-Jan-2024
Total Views |
- 9 शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी करणार शारीरिक कवायती

यवतमाळ, 
शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय तसेच वाणिज्य महाविद्यालय न्यास या संस्थांतील दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय व कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्यावतीने संयुक्त 'Physical Education Day' शारीरिक शिक्षण दिन कार्यक्रम शनिवार, 6 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (बी.पी.एड्) च्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशुद्ध व वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष विनायक दाते, प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री देवदत्त जोशी आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अमरावती विभाग उपसंचालक विजय संतान प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
 
 
'Physical Education Day'
 
'Physical Education Day' या कार्यक्रमात विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, घोडखिंडी, ध्रुव प्राथमिक शाळा, अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालय, कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बाबाजी दाते इंग्लिश मीडियम स्कूल, रामगोपाल बाजोरिया इंग्लिश मीडियम स्कूल या शाळातील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.
 
 
'Physical Education Day' : विद्यार्थ्यांच्या खेळ व क्रीडा कौशल्यांचे सादरीकरण होणार असलेल्या या कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक बंधू-भगिनी तथा क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या केळकर, सचिव विजय कासलीकर, सहसचिव मीरा केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, सदस्य जयराज पाठक, सुषमा दाते, उल्हास दाते, डॉ. रजनी कंचलवार, गोपाळ दाते, अजय पाटणकर, सुजाता दाते, महेश जोशी तसेच घटक संस्थांचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. वर्षा कुळकर्णी तथा मुख्याध्यापक किरण देशकर, बळवंत सहस्त्रबुद्धे, अस्मिता पळसोकर, प्रसाद कुळकर्णी, स्वाती जोशी व मीनाक्षी काळे यांनी केले आहे.