यवतमाळात तेली समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

05 Jan 2024 17:49:46
- महेश ढोले यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

यवतमाळ, 
Teli Samaj Var-Vadhu Parichay Mela तेली समाज विवाह व सांस्कृतीक मंडळाच्यावतीने रविवार, 7 जानेवारी रोजी संकट मोचन रोड संताजी मंदिराच्या प्रांगणात तेली समाजातील सर्व शाखीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष महेश ढोले यांनी गुरुवार, 4 जानेवारी रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पुढे बोलताना महेश ढोले म्हणाले 36 व्या मेळाव्याचे उद्घाटन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळचे अध्यक्ष महेश राम ढोले हे राहणार आहेत.
 
 
Tele Samaj
 
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष संध्या दिलीप सव्वालाखे या राहाणार आहेत. तर उपस्थितांमध्ये बाळासाहेब मांगुळकर, स्वराज्य शेतकरी संघटना आर्वी विधानसभा जयकुमार बेलखेडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष ढवळे, म.प्रा.तै.महासभा विभागीय अध्यक्ष शंकर हिंगासपुरे, श्री. संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ अध्यक्ष शैलेश गुल्हाने, ग्रामीण विकास मल्टीस्टेट क्रे.को.ऑप. सोसायटी अध्यक्ष डॉ. दीपक शिरभाते, प्रागतीक सहजीवन संस्था अध्यक्ष प्रभाकर सव्वालाखे, जिल्हा तेली समिती अमरावतीचे अध्यक्ष दिनेश बिजवे, तेली विकास मंचचे अध्यक्ष दिलीप क्षीरसागर यांचा समावेश आहे.
 
 
Teli Samaj Var-Vadhu Parichay Mela  या मेळाव्यासाठी शुभंमगलम् पुस्तीकेत सर्वशाखीय 484 उपवर-वधूची नोंदणी करण्यात आली आहे. या मेळाव्यास 5 ते 6 हजार समाज बांधवांची उपस्थिती राहिल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून वधू-वरांना बसण्याकरिता मोठा मंच तयार करण्यात आला आहे. हा वधू-वर परिचय मेळावा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे अध्यक्ष महेश ढोले यांनी यावेळी बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेला सचिव देविदास देऊळकर, रामकृष्ण पजगाडे, सुरेश अजमिरे, विद्या पोलादे, अशोक जयसिंगपूरे, प्रकाश मुडे, दामोदर मोगरकर, मनोहर गुल्हाने, सुरेश जयसिंगपूरे, राजेश चिंचोरे, जितेंद्र हिंगासपूरे, दिवाकर किन्हीकर, उत्तम गुल्हाने, रामकृष्ण शिरभाते, मुकुंद पोलादे, नंदकिशोर जिरापूरे, शिवदास गुल्हाने, किशोर गुल्हाने, रश्मी गुल्हाने, राम ढाले, डॉ. संजय अंबाडेकर, बाळासाहेब शिंदे, अभिजित शिंदे, अजाबराव तंबाखे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0