नवी दिल्ली,
T20 World Cup 2024 आईसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. १ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिल्या सामन्यात अमेरिकेचा सामना कॅनडाशी होणार आहे. यावेळचा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
टी-20 विश्वचषक 2024 1 जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेचा सामना कॅनडाशी होणार आहे. 1 जून ते 18 जून या कालावधीत ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. T20 World Cup 2024 यानंतर 19 जून ते 24 जून दरम्यान सुपर 8 टप्प्यातील सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२४ चा विजेतेपदाचा सामना २९ जून रोजी होणार आहे.
भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध 2024 टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. आयर्लंडचा सामना केल्यानंतर टीम इंडियाची पुढची लढत पाकिस्तानशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. यानंतर १२ जूनला भारतीय संघ अमेरिकेशी भिडणार आहे. त्याच वेळी, 15 जून रोजी टीम इंडिया ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना कॅनडासोबत खेळणार आहे, जो फ्लोरिडामध्ये खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. भारताशिवाय पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान यांना दुसऱ्या गटात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी यांना क गटात ठेवण्यात आले आहे. 'ड' गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ हे संघ आमनेसामने दिसणार आहेत.