कंबोडियातील अंगकोरवाट येथे विष्णू भागवत कथा

    दिनांक :08-Jan-2024
Total Views |
कंबोडिया,
Angkor Wat, Cambodia जगातील आठवे आश्चर्य आणि सर्वांत मोठे मंदिर कंबोडियातील अंगकोरवाट परिसरात नुकतेच विश्व मंदिर परिषदेद्वारा पहिल्या विष्णू भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. Angkor Wat, Cambodia श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या अमृतमय वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
 
 
Angkor Wat, Cambodia
 
Angkor Wat, Cambodia २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान विश्व मंदिर परिषदेने आयोजित केलेल्या अंगकोरवाट कंबोडिया धर्मयात्रेमध्ये भारत, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, युरोप आदी देशांमधून सुमारे २१०हून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते. या धर्मयात्रेदरम्यान दिवसभरात अंगकोर स्थापत्याच्या विविध मंदिरांना व वारसास्थळांना भेटी देणे आणि सायंकाळी विष्णुकथा श्रवण असा संपूर्ण कार्यक्रम होता.
 
Angkor Wat, Cambodia या यात्रेत अंगकोरवाट विष्णुधाम या मंदिराबरोबरच बयॉन, ता प्रोम, अंगकोर थॉम, फिमेनकस, एलिफंट टेरेस, लेपर्ड टेरेस, बांटी श्राई, प्रीह खा, निक पियान, स्रा स्रांग, बाखेंग, कबाल स्पियान, थाऊजंड लिंगा, बांटी कडाई, आदी ठिकाणांना सहभागी यात्रेकरूंनी भेटी देऊन प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा एक उत्कट आविष्कार अनुभवला. Angkor Wat, Cambodia यावेळी प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ‘अंगकोरवाट विष्णुधाम' या ग्रंथाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराथी आणि उडिया अशा तब्बल सात भाषांमध्ये एकाच वेळी प्रकाशन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी उपस्थित होते तसेच स्वराधीश भरत बलवल्ली, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागाचे संचालक डॉ. अंबरीश खरे, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष शैलजा अंधारे, सोमयाजी सुहोता आपटे, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र कुलकर्णी इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंगकोरवाट भारत फाऊंडेशन या संस्थेच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
 
Angkor Wat, Cambodia भारत सरकारच्या अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि मेकाँग गंगा को-ऑपरेशन अंतर्गत भारत आणि कंबोडिया देशांमधील सहकार्य आणि व्यापार पर्यटनवृद्धी याचे एक सामरिक महत्त्वही आहे. यासाठी अंगकोरवाट भारत फाऊंडेशन अर्थपूर्ण योगदान देऊ शकेल असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले.