व्हाईस ऑफ मीडियाचे कार्य उल्लेखनीय : सतिश शेवदा

आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

    दिनांक :08-Jan-2024
Total Views |
रिसोड, 
Satish Shevda पत्रकारांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, आपल्या लेखणीतून पत्रकार हा समाजाला योग्य दिशा दाखवतो. आपल्या लेखणी ऐवजी सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारा पत्रकार सर्वसामान्यांच्या व्यथा समस्या आपल्या लेखणीतून मांडून शासन व प्रशासनाला जागा करतो पत्रकारांचे कौतुक व सत्कार करणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. असे प्रतिपादन रिसोड नप चे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले. ते रिसोड येथील पत्रकार कार्यालयात आयोजित आरोग्य शिबिर कार्यक्रमात बोलत होते.
 
 
 
shatish shevada
 
व्हॉइस ऑफ मीडिया कडून ५ जानेवारी रोजी पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, ज्या पत्रकारांच्या पाल्यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे सत्कार सन्मान, सदन कास्तकार यांचा सन्मान, सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देणार्‍यांचा सत्कार, शासकीय सेवेत असून आपल्या कर्तव्यात पुरेपूर वेळ देणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार कार्यक्रम व तसेच विविध उपक्रम राबवून रिसोड येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ह्या होत्या.Satish Shevda कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, मुख्याधिकारी सतीश शेवदा, कृउबास सभापती संजय पाटील शिंदे, पंचायत समितीचे सभापती बंडू हांडे, डॉ. प्रशांत आटोळे, नेत्ररोग तज्ञ महेश खानझोडे, डॉ. सागर बाजड यांच्या माध्यमातून सर्व पत्रकारांची तपासणी करण्यात आली. शिबिर नंतर ज्येष्ठ पत्रकार मोहन देशमुख, प्रभाकर पाटील, गजानन बानोरे, ताराचंद वर्मा, उद्धव जटाळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन खरात, विवेकानंद ठाकरे, संतोष चर्‍हाटे, नोद बोडखे, दीपक शेवाळे, जयंत वसमतकर, रवी अंभोरे, अनंत भालेराव, निनाद देशमुख, सतीश मांदळे, केशव गरकळ, अमर रासकर, राहुल जुमडे, काशिनाथ कोकाटे, गजानन गाडे, अनिकेत खरात, फिरोज शाह, प्रभाकर नाईकवाडे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रुपेश बाजड यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख अन्सारोद्दीन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय जाधव, रणजितसिंह ठाकूर, महेंद्र महाजन, अमर कानडे, अजय कानडे आदी व्हाइस ऑफ मीडियाच्या सदस्यांनी परिश्रम केले. शहरातील रांगोळी कलाकार प्रतीक्षा साबळे हिने पत्रकार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर व्हाईस ऑफ मीडियाच्या लोगोची अत्यंत आकर्षक व सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाला येणार्‍यांचे लक्ष वेधले. तिच्या या रांगोळीचे कौतुकही मान्यवरांनी केले.