लक्षद्वीपमध्ये होणार नवीन विमानतळ

09 Jan 2024 22:30:09
नवी दिल्ली, 
Lakshadweep पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात लक्षद्वीपला भेट दिली आणि समुद्राच्या किनाऱ्यावर बसून काही फोटो आपल्या सोशल मीडियावर टाकले आणि Lakshadweep लक्षद्वीप जागतिक पर्यटकांचे आकर्षण ठरले. आता लक्षद्वीपचा विकास करण्यासोबतच केंद्र सरकारने एक नवीन योजना तयार केली आहे.
 
 
Lakshadweep
 
Lakshadweep येथील मिनिकॉय बेटावर नवीन विमानतळ तयार करण्यात येणार असून, तिथून लढाऊ विमाने, लष्करी विमाने आणि व्यावसायिक विमानांचे संचालन करण्यात येणार आहे. विमानतळावर तयार होणारी धावपट्टी लष्करी आणि नागरी अशा दुहेरी उपयोगाची असणार आहे. Lakshadweep लष्करी आणि लढाऊ विमानांना उड्डाण घेणे आणि उतरणे शक्य व्हावे, यासाठी दुहेरी वापराचे विमानतळ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
 
Lakshadweep  यापूर्वी, तिथे फक्त लष्करी वापरासाठी विमानतळ तयार करण्याची सरकारची योजना होती. मात्र, मोदी यांनी तिथे भेट दिल्यानंतर लक्षद्वीप जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे. त्यामुळे योजनेत बदल करण्यात आला आहे. या दुहेरी वापराच्या विमानतळामुळे भारत अरबी समुद्र आणि हिंद महासागरात चारही बाजूंनी लक्ष ठेवू शकणार आहे. समुद्री चाच्यांच्या कारवायांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. Lakshadweep या दुहेरी वापराच्या विमानतळाचे संचालन नौदल आणि हवाई दलातर्फे करण्यात येणार आहे. यामुळे चीनच्या कारवायांवरही अंकुश लावता येणार आहे. येथील मिनिकॉय बेटावर विमानतळ तयार करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम भारतीय तटरक्षक दलाने दिला होता.
Powered By Sangraha 9.0