पर्याटकांसाठी बोर व्याघ्र प्रकल्पाचे दरवाजे खुले

*जंगल सफारीचा अनुभव घ्या : माजी खा. रामदास तडस

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Bor Tiger Reserve : बोर व्याघ्र महाराष्ट्रातील नवे तर संपुर्ण देशातुन आकर्षणाचे केन्द्र ठरत आहे. जंगल परिसराला पर्यटकांनी भेट द्यावी व स्थानिक रोजगारांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन माजी खासदार रामदास तडस यांनी केले. वर्ष 2024 जंगल गेट सफारी शुभारंभ तसेच वन्यजीव सप्ताह उद्घाटनप्रसंगी माजी खासदार तडस बोलत होते.
 
 
 
BOR
 
 
जंगल सफारी जुन महिन्यात पावसाळी परिस्थीतीमुळे बंद होते. भौगालिक परिस्थिती अनुसार 1 ऑक्टोंबरपासुन पुन्हा सुरू होते. आज बोर व्याघ्र परीसरात या वर्षीच्या पहिल्या प्रवासी जिप्सी सफारी गाडीला हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी माजी खासदार रामदास तडस यांनी आपल्या परिवार व सहकार्‍यांसोबत बोर व्याघ्र प्रकल्पात टायगर सफारीचा आनंद घेतला.
 
 
अनेक स्थानिक घटक जंगल सफारी या उपक्रमामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार प्राप्त करीत असतात. जिप्सी चालक, गाईड, गाडीमालक, स्थानिक हॉटेल व्यवसाईक व लहान उद्योजक या सर्वांना पर्यटनामुळे रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे पर्यटकांनी या निसर्ग रम्य परिसराला भेट द्यावी असे आवाहन माजी खासदार तडस यांनी केले.
 
 
यावेळी बोर उपसंचालक ठेंगडी, वन परिक्षेत्र अधिकारी नौकरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राम्हणे, देवळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष शोभा तडस, वर्धा नपचे माजी बांधकाम सभापती निलेश किटे, गजानन गावंडे, वर्धा जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य प्रणव जोशी यांच्या सह अनेक पर्यटक, जिप्सीचालक, गाईड, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.