नवी दिल्ली.
Health effects of fasting येत्या दोन दिवसात नवरात्रीला सुरूवात होणार आहे. अनेक जण देवाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचे उपवास करतात. दरम्यान, हिंदू धर्मात उपवासाचे धार्मिक महत्व तर आहेच त्यासोबतच वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत. मात्र, अशावेळी उपास करून शरीराला त्रास होऊ शकतो काय ? काही लोक भक्तीने तर काही वजन कमी करण्याच्या उद्देशाने उपवास करतात. परंतु काही लोकांच्या मते उपवास करणे म्हणजे शरीराला त्रास देणे आहे. मात्र, तज्ज्ञांनी तासगणिक उपवासाचे काही फायदे सांगितले आहे, चला तर मग जाणून घेऊ या...
यावर तज्ज्ञ सांगतात की, २४ तासांपेक्षा जास्त उपास केल्याने केटोसिस खोल होतो आणि ऑटोफॅजी वाढते. यामुळे, इन्सुलिन पातळीत लक्षणीय घट होण्यासह नुकसानकारी चरबी कमी होण्यास प्रोत्साहन मिळते आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याची शरीराची क्षमता वाढवते. मात्र, २४ तास उपास करण्याआधी तुमचे शरीर निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. Health effects of fasting जर तुमचे शरीर निरोगी आहे तर तुम्ही नक्कीच २४ तासांचा उपास करू शकता. २ ते ३ दिवसांचा उपास करणे योग्य नाही. असेही तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. २ ते ३ दिवस दिर्घकाळ उपवास करतांना पोषक घटकांचा अभाव यांसारख्या क्रियाकलापांमध्ये ऑटोफजी वाढू शकते.ज्यामुळे पेशींवर ताण येतो. म्हणूनच, उपास करताना शक्यतोवर सलग ९ दिवस उपास करणे टाळा.