केरळच्या राज्यपालांच्या शालला दीपप्रज्वलन दरम्यान आग लागली

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |
तिरुअनंतपुरम, 
Kerala Governor shawl caught fire केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आज एका मोठ्या अपघातात थोडक्यात बचावले. मंगळवारी पलक्कड येथे एका कार्यक्रमादरम्यान दिवा लावत असताना राज्याचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्या शालला आग लागली, मात्र ती लगेचच विझवण्यात आली. शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला वेळीच शालला आग लागल्याचे दिसले हे सुदैवी.
 
Kerala Governor shawl caught fire
 
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, शबरी आश्रमाच्या शताब्दी समारंभाच्या समारोपाच्या वेळी राज्यपाल दीपप्रज्वलन करण्यासाठी वाकले असता त्यांच्या शालला आग लागली. शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आग लागल्याचे पाहताच गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्या खांद्यावरून शाल ओढली. यानंतर त्यांनी हाताने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. सूत्रांनी सांगितले की, “जागीच आग तातडीने विझवण्यात आली. Kerala Governor shawl caught fire या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेनंतर गव्हर्नर आरिफ खान म्हणाले की, मी ठीक आहे. या घटनेनंतर राज्यपालांनी कार्यक्रम सोडला नाही. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावली आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते निघून गेले. गव्हर्नर खान यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केल्यानंतर ते शेजारी दिवा लावण्यासाठी वळले तेव्हा हा अपघात झाला.