इतस्तत:
- दत्तात्रेय आंबुलकर
Navratri 2024-Women empowerment आजकाल महिला पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करतात. स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे पूजन करण्याचा सण म्हणजेच नवरात्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्त्रियांना त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव झाली असून, त्या आता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवस्थापनाची धुराही समर्थपणे सांभाळत आहेत. कंपनीतील प्रत्येक विभागात आज महिलांचा समावेश अधिक करण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. Navratri 2024-Women empowerment कंपनी व्यवस्थापन क्षेत्रात महिलांची अधिक प्रमाणात निवड करून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे आव्हान आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच कंपनी व्यवस्थापनांपुढे उभे आहे. या पृष्ठभूमीवर भारतातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत विशेष प्रयत्न केले आहेत. या संदर्भात नव्यानेच प्रकाशित झालेल्या संशोधन अभ्यासानुसार, भारतीय व्यवस्थापन कंपन्यांपैकी सुमारे ६३ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांची निवड करताना, महिला उमेदवारांना धोरणात्मक स्वरूपात प्राधान्य देण्यावर भर देतात. सुमारे पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण ४१ टक्क्यांवर होते.
(इंटरनेटवरून साभार)
Navratri 2024-Women empowerment राजधानी दिल्लीतील वुईएस या कर्मचाऱ्यांचा कौशल्य विकास, प्रशिक्षण-मार्गदर्शन क्षेत्रात विशेष स्वरूपात काम करणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीने केलेल्या अभ्यासावर आधारित अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत देशातील उद्योग-व्यवसायांतील अधिकांश म्हणजे, ६३ टक्के कंपन्या, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी व त्यांनी अधिक जबाबदारीच्या पदांवर काम करण्याची संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच संशोधनात सहभागी झालेल्या ८६ टक्के कंपन्यांनी त्यांच्या भविष्यकालीन गरजा लक्षात घेता, महिला-कर्मचाऱ्यांमध्ये व्यवस्थापकीय गुण व नेतृत्व विकासासाठी विशेष प्रशिक्षणासारखे प्रयत्न सुरू केले आहेत, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. आज एकीकडे प्रगत तंत्रज्ञान-संशोधन व प्रक्रियेचा अवलंब करण्यावर कंपन्यांचा भर असतानाच नव्या बदल प्रक्रियेमध्ये महिला कर्मचारी व व्यवस्थापकांना अधिकाधिक प्रमाणात सामावून घेण्यावर कंपन्यांचा भर दिसून येतो.
Navratri 2024-Women empowerment या क्षेत्रांत महिलाही पुरुषांच्या बरोबरीने पुढाकार घेत असून, उत्पादन क्षेत्रापासून अणू संशोधन क्षेत्रापर्यंत महिला उमेदवार सहज उपलब्ध होतात. ही बाब व्यवस्थापक आणि व्यवस्थापन क्षेत्रात सकारात्मक परिणामांसह दिसून येते. याचाच परिणाम म्हणून प्रमुख कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या निवडीच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्व प्रसारित-प्रचारित करण्यात येतात. सर्वेक्षणात नमूद केल्याप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांची निवड आणि विकास या मुद्यावर कंपनी स्तरांवर व कंपनी अंतर्गत अनुभवांवर आधारित मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात येते. अशा सत्रांचासुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे, असे मत वुईएसच्या सहसंस्थापक अनुरंजिता कुमार यांनी व्यक्त केले आहे. सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार, आज व्यवस्थापन पद्धती स्वरूपात महिला कर्मचाऱ्यांच्या समावेशकतेचा स्वीकार करण्यात आला आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या सुमारे ५१ टक्के कंपनी-व्यवस्थापनांनी, आपल्या व्यवस्थापन स्तरावरील एक प्रमुख व्यावसायिक उद्दिष्ट म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये विविध स्तरांवर महिलांच्या संख्यावाढीला प्रोत्साहन देणे, कर्मचारी निवडीच्या संदर्भात स्त्री-पुरुष उमेदवारांमध्ये भेदभाव न करणे, कामाच्या ठिकाणी समावेशकता या मुद्यांचा समावेश केला आहे.
Navratri 2024-Women empowerment या नव्या वैचारिक कार्यशैलीचा कंपनीच्या सर्व स्तरांवर प्रसार-प्रचार करण्यासाठी, अधिकांश कंपन्या या व्यवस्थापक व व्यवस्थापन स्तरावर विशेष संवादसत्र व प्रशिक्षणाचे आयोजन करीत आहेत. त्याचसोबत कंपनी अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांनी अधिक मोठी, अधिकार व जबाबदारीची कामे करण्यासाठी, प्रशिक्षित व अनुभवी महिला कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या विशेष प्रशिक्षण सत्रांमध्ये व्यवस्थापन शैली, व्यवसायवृद्धी, प्रभावशाली संवाद, निर्णयक्षमता, नेतृत्व विकास, परस्पर संबंध इत्यादींचा समावेश केला जातो. या प्रशिक्षणाचा महिला कर्मचाèयांना पदोन्नतीसाठी उपयोग होतो, असा अनुभव आहे. एकीकडे नव्याने कर्मचाऱ्यांची निवड करताना, महिला उमेदवारांचा त्यांच्या कौशल्य व गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारेही विचार केला जातो. हे करत असतानाच आज वाढत्या संख्येत कंपनी-व्यवस्थापनांद्वारा महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विविधता, समानता व समावेशकता या व्यवस्थापन त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे.
Navratri 2024-Women empowerment या प्रयत्नांना अधिक गतिमान करण्यासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी ३४ टक्के कंपन्या प्रयत्नशील होत्या; आज हे प्रमाण सुमारे ५१ टक्क्यांवर गेले आहे. यावरून या विषयातील व्यवस्थापनांद्वारा घेतलेले गांभीर्य सहजपणे लक्षात येते. महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रामुख्याने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सध्या डीबीएस बँक अंतर्गत जागतिक स्तरावर महिला कर्मचाऱ्यांची टक्केवारी ५० असून, त्यापैकी उच्च व्यवस्थापन श्रेणीतील महिला व्यवस्थापकांचे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे हे विशेष! बँकेच्या व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, भारतात सध्या डीबीएस बँकेत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण सुमारे ३० टक्के असून आगामी तीन वर्षांत महिलांची टक्केवारी ३५ वर नेण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरू आहेत. Navratri 2024-Women empowerment या प्रयत्नांच्या पूर्ततेसाठी बँकेतर्फे एका उच्चस्तरीय कार्यकारी समितीची स्थापना केली असून, या उच्चस्तरीय समितीतर्फे यासंदर्भात विशिष्ट कालावधीनंतर आढावा घेतला जातो. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मानव-संसाधन विभाग प्रमुख किशोर पोदुरी यांच्यानुसार, त्यांच्या या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम बँकेच्या व्यवस्थापनापासून व्यवसायापर्यंत सर्वदूर दिसू लागले आहेत. अशाच प्रकारचे प्रयत्न आणि उपक्रम डीसीएम-श्रीराम उद्योग समूहांतर्गत केले जात आहेत.
कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांची निवड करताना विशिष्ट धोरणात्मक निर्णय घेत नव्या-जुन्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणाद्वारे विकास करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. या संदर्भात आपला अनुभव नमूद करताना डीसीएम-श्रीरामचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गिरोत्रा यांनी म्हटले आहे की, महिलांच्या संदर्भातील धोरणांची निश्चिती करण्यापासून त्याच्या अंमलबजावणीच्या कामापर्यंतची जबाबदारी, उच्च व्यवस्थापनावर सुरुवातीपासूनच ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम अल्पावधीत व स्पष्टपणे दिसून येत आहे. Navratri 2024-Women empowerment याबाबत आपापला व्यवसाय, त्याचे स्वरूप व गरजांच्या प्राधान्यांसह प्रयत्न केले जात आहेत. यातून कर्मचाऱ्यांचे प्रमाण व त्यांच्या कामकाजाचा समतोल राखण्यात या कंपन्यांना यश येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण यशस्वी उपक्रम म्हणून स्नॅडर इलेक्ट्रिक कंपनीच्या पुढाकाराचा विशेष उल्लेख करावा लागेल. महिला कर्मचाऱ्यांचा विकास आणि प्रगतीसाठी २०१५ पासून कंपनीमध्ये ऊर्जा या उपक्रमाची अंमलबाजावणी यशस्वीपणे करण्यात येत आहे. आजवर या प्रयत्नांतून स्नॅडर इलेक्ट्रिक कंपनीमध्ये ९०० महिलांना विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात येऊन, त्याचा फायदा महिलांच्या विकासापासून सर्वदूर दिसून येत आहे.
९८२२८४७८८६