नागपूर,
train schedules : रेल्वेच्या विविध मार्गावर इलेक्ट्रॉनिक नॉन इंटरलॉकिंगचे काम केल्या जात याशिवाय तिसर्या आणि चौथ्या मार्गाचे काम सुरु असून स्थानकाच्या विकासकामामुळे अनेक रेल्वे उशिरा धावत आहे. मंगळवारी नागपूर स्थानकावर केरला एक्सप्रेस पुन्हार ११ तास उशिरा आली. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याशिवाय ७ रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना उपलब्ध असलेल्या रेल्वेतून प्रवास करावा लागला.
८ रेल्वे विलंबाने आल्यामुळे प्रवाशांना गाडीच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागले. नियमित रेल्वेगाड्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर होत असल्याने प्रवाशांना विनाकारण त्रास सहण करावा लागत आहे. मंगळवारी १२६२६ नवी दिल्ली - त्रिवेंद्रम केरला एक्सप्रेस ११ तास विलंबाने आली तर १२६२२ तामिळनाडू एक्सप्रेस १० तास, १२६४९ संपर्कक्रांती एक्सप्रेस ४ तास ४५ मिनिट, १२७२४ नवी दिल्ली- हैदराबाद तेलंगणा एक्सप्रेस ३ ४८ मिनिट, ०७६४८ सिकंदराबाद - दानापूर स्पेशल ३ तास ४५ मिनिट, २०८०५ आंध्रप्रदेश एक्सप्रेस २ तास ४५ मिनिट, १२८६० हावडा- मुंबई गितांजली एक्सप्रेस २ तास ३६ मिनिट, १२१३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्सप्रेस २ तास १५ मिनिट उशिरा आली. याशिवाय ०६५०९ बंगळूर- दानापूर हमसफर एक्सप्रेस, ०३२५१ दानापूर - बंगळूर रेल्वे, ०३२५३पटना - सिकंदराबाद एक्सप्रेस, २२६४८ मंगलोर एक्सप्रेस, ०४७१८ तिरुपती एक्सप्रेस, ०७०३२ हजरत निझामउददीन - सिकंदराबाद एक्सप्रेस, १२६४८ कोंगू - सुपर फास्ट एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवाशांना अन्य मार्गाने प्रवास करावा लागला. नियमित रेल्वेगाड्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.