पहिल्या बॉलीवूड चित्रपटाने झाली प्रसिद्ध

आधी होती गोल्फ प्लेअर,

    दिनांक :10-Oct-2024
Total Views |
Rakul Preet Singh  फोटो मध्ये दिसणाऱ्या या गोड मुलीने आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथ आणि बॉलीवूड चित्रपटश्रुष्टि गाजवली आहे. आर्मी कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीला लहान पानापासून अभिनेत्री बनायचं होत. आणि आता ती भारताच्या टॉप हिरोईन मधून एक आहे.आज तिचा वाढदिवस. चला जाणून घेऊया या गोड मुली बद्दल.

rakul  
 
 
फोटो मध्ये दिसणारी ही गोड मुलगी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आहे Rakul Preet Singh . आज तीचा ३४वा वाढदीवस. फक्त बॉलीवूड नाही तर साऊथ सिनेश्रुष्टीत देखील तिने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. रकुलने तिच्या सिनेश्रुष्टीची सुरुवात २००९ मध्ये 'गिल्ल्ली' या चित्रपटापासून केली. तिने तामिल, तेलगू, चित्रपटात देखील काम केला. 2014 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आपल्या दमदार अभिनय आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या रकुल प्रीतला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरस्टार आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्तरावरील गोल्फपटू असलेल्या रकुलने खेळ सोडून अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये स्वत:चे नाव कमावण्याचा निर्णय घेतला.
बॉलिवूड चित्रपटातून मिळाली ओळख
दाक्षिणात्य चित्रपट 'गिल्ली' मधून बॉलीवूड चित्रपटसृष्टीत Rakul Preet Singh प्रवेश केल्यांनतर तिला विशेष ओळख मिळाली. तिचा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला बॉलिवूड चित्रपट 'यारियां' होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाली होती. तिच्या लूक आणि कामाची लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. 'यारियां' नंतर त्याला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या.
एका खास कारणासाठी इंडस्ट्रीत केला प्रवेश
राष्ट्रीय स्तरावरील गोल्फपटू असलेल्या रकुल प्रीत सिंगने Rakul Preet Singh केवळ नाव कमविण्यासाठी नव्हे तर एका खास कारणासाठी इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. खरं तर, रकुलने वयाच्या १८ व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता, पण तिने हा चित्रपट प्रसिद्धीसाठी नव्हे तर पॉकेटमनीसाठी साइन केला होता. रकुल प्रीतने तिच्या 15 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'दे दे प्यार दे', 'थँक गॉड', 'मरजावां' आणि 'ध्रुव', 'देव' आणि 'इंडियन 2' सारख्या साऊथ चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली.
आगामी चित्रपट
Rakul Preet Singh   'दे दे प्यार दे 2'मध्ये रकुल प्रीत पुन्हा अजय देवगण आणि तब्बूसोबत दिसणार आहे. लव फिल्म्स आणि टी सीरीजने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले, 'दे दे प्यार दे 2,1 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुल शर्मा करणार आहे. तरुण जैन आणि लव रंजन यांनी ते लिहिले आहे.