समाजात परिवर्तनाचे संघकार्य ईश्वरी : महेंद्र रायचुरा

Buldhana-RSS-Hindu देशात धर्म कार्यात अग्रगण्य

    दिनांक :14-Oct-2024
Total Views |
बुलढाणा, 
 
 
Buldhana-RSS-Hindu विकसीत देशात भारताची गणना झाली आहे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विविध क्षेत्रात राष्ट्रहिताचे कार्याने जगात सर्वोच्च संघटन निर्माण करून शंभर वर्षात पदार्पण करीत आहे. या काळात अनेक महाविभूतीचे स्मरण करावे लागणार आहे. हिंदू धर्माला विरोध करणार्‍या परकियांनी आक्रमण करून इस्लाम, ख्रिश्चन देशांनी भारताला लुटण्याचा प्रयत्न केला हा इतिहास विसरून चालणार नाही.  Buldhana-RSS-Hindu संघाच्या माध्यमातून सामाजिक समरसता, नागरिकांचे कर्तव्य, स्वदेश जनजगारण, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे ईश्वरी कार्य अविरत सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे पश्चीम क्षेत्र धर्मजागरण प्रमुख महेंद्र रायचुरा यांनी केले.
 
 
 
Buldhana-RSS-Hindu
 
 
Buldhana-RSS-Hindu राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बुलढाणा नगर शाखेचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव दि.१३ ऑक्टोबर रोजी सांयकाळी गर्दे वाचनालय सभागृहात संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री स्वामी समर्थ उपासना बालसंस्कार केंद्र प्रमुख रामनगर बुलढाण्याचे मोरेश्वर खिरोडकर, विभाग संघचालक चित्तरंजन राठी, नगर संघचालक महेश पेंडके उपस्थित होते. प्रारंभी भारत माता पूजन, शस्त्रपूजन दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते महेंद्र रायचुरा यांनी सांगितले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही जगात सर्वश्रेष्ठ संघटना शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असतांना अनेक महाविभुतीचे स्मरण करतांना राणी दुर्गावतीने समाजात देशात धर्म कार्यात अग्रगण्य कार्य केले. Buldhana-RSS-Hindu पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी हिंदू धर्मातील नितीमुल्यांचे पालन करतांना वाईट रुढी परंपरा नष्ट केल्यात. भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी लढा दिला. वर्षातील 365 दिवसात विजया दशमीला हिंदू धर्म संस्कृती उत्सवाला फार महत्व आहे. आसुरीशक्तीचा नाश करून नवरात्रीत माँ दुर्गांचे पुजन स्मरण केल्या जाते.
 
 
 
 
Buldhana-RSS-Hindu दुराचारी रावणाचा वध प्रभुराम चंद्रांनी या दिवशी केला अविचारी कौरवाचा नाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी पांडवाच्या माध्यमातून केला. शस्त्रपुजन सिमोलंघनाचा इतिहासात सर्व शक्तीची आराधना आपण विजयादशमीला करतो. हिंदू विरोधी विचारांनी संघावर बंदी आणली स्वयंसेकांची घरे, दुकाने जाळून टाकली एवढेच नाही तर प्राथमिक शिक्षण घेणार्‍या इयत्ता पाचवीच्या स्वंयसेवक विद्यार्थ्याची शाळा सोडण्याच्या दाखल्यावर रष्टीकेट लिहण्यात आहे. संघाला संपवून टाकणाचा अविचार सत्ताधार्‍यांनी केला. या देशाला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुसंस्कृत राष्टहित जोपणार्‍या संघटनेच्या शंभर वर्षाच्या साधनेकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. Buldhana-RSS-Hindu निरपेक्ष भावनेतून संघाचे कार्य अविरत सुरु आहे. देशाला संपविण्यासाठी अनेक शक्ती विव्देश पसरवून आरक्षण, संविधान संपविण्याचा अपप्रचार करून हिंदूना असुरक्षीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी सज्जन शक्ती सुजान नाागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आर्वजून सांगितले.
 
 
 
प्रमुख अतिथी मोरेश्वर खिरोडकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले आपल्या देशात अनेक धर्मपंथाचे लोक राहतात पंरतू हिंदूधर्माने व्देष केला नाही. सध्या स्थितीत भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. भावी पिढी घडविण्यासाठी आपल्या पाल्यांवर संस्कार मुल्यासोबत शिक्षण देणे गरजेचे आहे. हिंदू सुरक्षीत राहिला पाहिजे धर्माचे पालन करून संघाला शताब्दी वर्षात समाज प्रबोधन करण्याचा विडा प्रत्येकाने उचलावा असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक नगर संघचालक महेश पेडंके यांनी केले. प्रारंभी संघ स्वयंसेवकांनी शारिरीक प्रात्याक्षिक, सांघिक गीत ,शुभाषित, अमृतवचन, वैयक्तीक गीत सादर केले. विजया दशमी उत्सवाला शहरातील नागरिक व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.