मुंबई
bollywood movie कार्तिक आर्यनने 'सिंघम अगेन'सोबतच्या 'भूल भुलैया ३' च्या क्लॅशवर आपले मौन तोडले आहे. त्याने अजय देवगण आणि रोहित शेट्टीचेही खूप कौतुक केले. दोन्ही चित्रपटांचे हिट होण्याचा फॉर्म्युला खूप वेगळा असल्याचेही कार्तिकने सांगितले. कार्तिक आर्यन त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया ३' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे,
ज्यामध्ये, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती दिमरी यांच्याही भूमिका आहेत. दिवाळीला रिलीज होणारा हॉरर-कॉमेडी बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन'शी टक्कर देणार आहे. दरम्यान, नवीन खुलासे करताना कार्तिकने अनीस बज्मी आणि रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांबद्दलही बोलले आहे. तसेच अजय देवगण आणि 'सिंघम अगेन'च्या संपूर्ण स्टारकास्टचे कौतुक केले. बॉलीवूडचा आकर्षक अभिनेता कार्तिक आर्यन यानेही दोन चित्रपटांमधील संघर्षाचा बॉक्स ऑफिसवर काय परिणाम होईल हे सांगितले.
कार्तिक आर्यनने चित्रपट हिटचा सांगितला फॉर्म्युला
पापाराझी bollywood movie व्हायरल भयानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संभाषणात कार्तिक आर्यनने त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया ३' आणि अजय देवगणचा 'सिंघम अगेन' यांच्यातील संघर्षाबद्दल सांगितले आहे. 'भूल भुलैया ३' आणि 'सिंघम अगेन' मध्ये टक्कर झाली तर हा चित्रपट हिट होईल का ? असा प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात आला. याला उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'दिवाळी आता खूप सुट्ट्या आहेत .मला वाटते की दोन चित्रपट आरामात काम करू शकतात आणि सिंघम अगेनमध्ये ॲक्शन प्रकार आहे, आमचा हॉरर-कॉमेडी प्रकार आहे. मला वाटतं, जर मी चित्रपट पाहणारा प्रेषक म्हणून बोललो, तर आपल्या सर्वांसाठी ही एक पर्वणी आहे की आपल्याला २ पर्याय मिळत आहेत, जे आजकाल आपल्या इंडस्ट्रीत रेअर होत चालले आहेत. त्यामुळे, दोन्ही चित्रपट हिट होऊ शकतात.
सिंघमसोबत झालेल्या संघर्षावर कार्तिक आर्यनची पहिली प्रतिक्रिया
कार्तिक आर्यन bollywood movieपुढे म्हणाला, 'आपण अनेकदा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याबद्दल वाचतो आणि पाहतो. आता दिवाळीत असे दोन चित्रपट येत आहेत, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मलाही त्याचा चित्रपट आवडला आणि तो बघायला जाईन. मला आशा आहे की तुम्ही देखील आमचा चित्रपट पहायला याल. दोन्ही चित्रपट हिट होऊ शकतात. मला वाटत नाही की, कोणत्याही चित्रपटात संघर्ष आहे. मला रूह बाबा विरुद्ध मंजुलिका यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. सिंघम अगेन ही एक मोठी फ्रँचायझी आहे, अजय सर, रोहित सर आणि चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाने उत्तम काम केले आहे. मला वाटतं 'क्लेश ' हा शब्द खूप चुकीचा आहे. कारण मला वाटतं की मी पण त्याचा फॅन आहे, मी एवढा मोठा फॅन आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलणंही मला योग्य वाटत नाही