मालाडमध्ये आकाश नावाच्या तरुणाची 'या' कारणावरून हत्या!

    दिनांक :15-Oct-2024
Total Views |
मुंबई,
Malad murder case : मुंबईतील मालाडमध्ये गेल्या शनिवारी रोड रेजची घटना घडली होती, ज्यामध्ये आकाश नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी एक मोठा अपडेट समोर आला आहे.
 

MURDER 
 
काय प्रकरण आहे?
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत मृत आकाश खण हा मालाड परिसरातील शिवाजी नगर चौकातून आपल्या कुटुंबासाठी नवीन कार बुक करून परतत होता. आकाश हा त्याच्या दुचाकीवरून तर त्याचे आई-वडील ऑटो रिक्षाने येत होते.
 
बाचाबाची झाल्यानंतर आकाशने तेथे उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला केला
 
ओव्हरटेक करण्यावरून रिक्षाचालक आणि आकाश यांच्यात बाचाबाची झाली, त्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. आजूबाजूचे लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण आकाशने तिथे उभ्या असलेल्या काही लोकांवर अचानक हल्ला केला, त्यानंतर इतर लोकांनीही आकाशला बेदम मारहाण केली.
 
आकाशला मारहाण होत असल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण यादरम्यान संतप्त लोकांनी त्याच्या वडिलांनाही बेदम मारहाण केले आणि आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावर लोटून गेली तरी सुद्धा त्याला मारहाण करतच होते.
 
 
पोलिस सूत्रांनी काय सांगितले?
 
या प्रकरणी पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, मारामारीदरम्यान आकाशचा मृत्यू होईल असे वाटत नव्हते मात्र त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणामध्ये आकाशवर हल्ला करणाऱ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांनी एकूण 10 जणांना अटक केली आहे. अटक आरोपींवर भादंवि कलम 103(1), 115(2), 352, 324(4), 189(2), 189(4), 190, 191(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
सध्या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी प्राथमिक तपासात आकाशला काही ऑटोचालकांनी मिळून मारहाण केल्याचे दिसून आले मात्र तसे नाही. ऑटोचालक अविनाश कदम आणि आकाश यांच्यात बाचाबाची झाली, इतर ऑटोचालक तेथून निघून गेले.