वणी,
राज्य सरकारर्ते राबवण्यात येणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राबविण्यात येणाऱ्या Vasundhara Abhiyan माझी वसुंधरा अभियान 4.0 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्वराज्य संस्थांना बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 50 हजार ते 1 लाख लाेकसंख्या गटात अमरावती विभागातून वणी नगर परिषदेने दुसरा क्रमांक पटकावून 50 लाखांचे बक्षीस जिंकले.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 2 ऑक्टाेबर 2020 पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 हे राज्यांतील स्वराज्य संस्थेत 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील 414 स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 22 हजार 218 ग्रामपंचायती अशी एकूण 22 हजार 632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला हाेता. माझी वसुंधरा अभियान याेजने अंतर्गत मूल्यमापन करून निकाल शासनाद्वारे घाेषित करण्यात आला.
Vasundhara Abhiyan घनकचरा वृक्षाराेपण करून शहराचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वणी नगर परिषदेने केलेल्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने वसुंधरा अभियानात विभागात सर्वाेत्तम काम करणाऱ्या वणी नगरपरिषदेला अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक देण्यात आला. यामध्ये वणी नगर परिषदेला 50 लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. या अभियानात प्रशासक व मुख्याधिकारी डाॅ. सचिन गाडे, उपमुख्य अधिकारी जयंत साेनटक्के व शहर समन्वयक मयूर मुंदाने व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.