बुध संक्रमणामुळे 5 राशींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग!

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
Mercury transit on Dhantrayodashi वाणी, व्यवसाय आणि धनाचा कारक बुध धनत्रयोदशीच्या दिवशी (29 ऑक्टोबर 2024) वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे हे संक्रमण लक्ष्मी नारायण योग तयार करेल. धनत्रयोदशीच्या दिवशी तयार झालेल्या लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे मिथुन राशीसह पाच राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रचंड प्रगती होईल. याशिवाय दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आर्थिक स्थितीही मजबूत होईल. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रह हा बुद्धिमत्ता आणि संपत्तीचा कारक मानला जातो. तर शुक्र हा सुख, समृद्धी आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या दिवशी बुध आणि शुक्राच्या संयोगाने तयार झालेला लक्ष्मी नारायण राजयोग कोणत्या राशीच्या भाग्यात बदल करणारा ठरेल.
 

bdhyda 
मिथुन
धनत्रयोदशीला बुधाचे संक्रमण या राशीसाठी विशेष आहे. या दिवशी बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नरणय राजयोग तयार होईल, ज्याच्या शुभ प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. तुम्हाला कमाईच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला धनाची देवी लक्ष्मी देवीकडून विशेष आशीर्वाद प्राप्त होतील. व्यवसायात प्रचंड आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होईल. मात्र, अतिरिक्त खर्च होईल.
सिंह 
बुध ग्रहाच्या या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना नोकरीत उत्कृष्ट कार्यासाठी विशेष ओळख मिळू शकते. बुध संक्रमणाच्या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात मोठी आर्थिक प्रगती होईल. बँक बॅलन्स वाढेल. याशिवाय शुक्राच्या अनुकूलतेमुळे धनात वाढ होईल.
तूळ
बुधाचे हे संक्रमण या राशीला प्रचंड आर्थिक लाभ देईल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रतिमा तयार होईल. विवाहितांना सासरच्यांकडून आर्थिक मदत मिळू शकते. त्याचबरोबर लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे जीवनात लक्षणीय प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या अनेक उत्तम संधी मिळतील. तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ होईल.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे आनंदी जीवन जगतील. संक्रमण काळात कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. बुध ग्रहाच्या अनुकूलतेमुळे मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. मित्रांकडून अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात आर्थिक लाभाच्या अनेक शुभ संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून आशीर्वाद मिळेल. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे सुखाची साधने वाढतील.
कुंभ
कुंभ राशीसाठी बुधाचे संक्रमणही शुभ आणि लाभदायक आहे. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. राहणीमान पूर्वीपेक्षा चांगले होईल. प्रतिकूल परिस्थितीतही नशीब तुमच्या पाठीशी असेल. उत्पन्न वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावाचा सर्वांगीण फायदा होईल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. सौभाग्य लाभेल.