विश्व मांगल्य तर्फे कोजागिरी पौर्णिमा

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
नागपूर,
Vishwa Mangalya Sabha विश्व मांगल्य सभा, तात्या टोपे नगर तर्फे मासिक सदाचार सभेचे औचित्य साधुन आणि सामाजिक संवेदना जपत कोजागिरी पौर्णिमा या कार्यक्रम अंध विद्यालय, येथे अतिशय उत्साहवर्धक आणि संवेदनशील वातावरणात आयोजन करण्यात आले होते.

fgdny
 
इयत्ता ५ ते ९ या वर्गातील जवळपास १२० अंध मुले आणि मुली सहभागी झाल्या होत्या. जे आयुष्यात या जगातील काहीही स्वतःच्या डोळ्यांनी कधीही न बघू शकणाऱ्या ७ ते १४ वर्ष वयोगटातील मुल, मुलींनी "माणसाने माणसाशी माणसा सम वागावे" हि हृदयस्पर्शी प्रार्थना गायली. मुलांशी संवाद साधतांना एका छोट्या मुलीचं मला कलेक्टर व्हायचंय हे वाक्य मनात घर करून गेले. उपस्थितांनी दूध व अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. Vishwa Mangalya Sabha विश्व मांगल्य सभेच्या विद्या कांत, वृषाली ओक, वृषाली ढोक, लता खानोरकर, शोभना खानोरकर, नंदा गोथे, सुषमा ठावरे, योगिनी पांडे, मेघा गणोरकर, सरोज रथकंठीवार, राजश्री खांडवे या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. संस्थेचे सचिव मकरंद पांढरीपांडे आणि प्राचार्य महेश टेंभरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
सौजन्य: चंद्रहास मुळे, संपर्क मित्र