संस्कृतचे गाढे अभ्यासक वसंत गाडगीळ यांचे निधन

18 Oct 2024 20:45:00
पुणे, 
येथील शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक, संस्कृतचे गाढे अभ्यासक Vasant Gadgil वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्रीवर्धन, सून आणि मोठा आप्त-मित्रपरिवार आहे.
 
 
vasant-gadgil
 
Vasant Gadgil : गाडगीळ हे झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचे अध्ययन, शारदा ज्ञानपीठम्ची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास केला होता. पं. वसंत गाडगीळ प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषिपंचमीनिमित्त ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्याने विधायक कार्य करणाèया पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार घडवून आणत. ते संस्कृत भाषेविषयी नेहमी आग्रही असत. ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्राचीन ग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी शारदा संस्कृत नावाने ते मासिक चालवत होते.
Powered By Sangraha 9.0