बालाजी देवस्थानचा नवरात्र महोत्सव!

02 Oct 2024 20:02:11
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Navratri Festival 2024 : बालाजी देवस्थान मंडळ, बालाजी सोसायटी, वीर सावरकर नगर द्वारा ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र महोत्सव होत आहे. या दरम्यान दररोज पहाटे ५.३० वाजता पंचसुक्त पवमान अभिषेक होणार आहे. तसेच दररोज संध्याकाळी आरती, प्रार्थना व अष्टक होईल.
 
 
DEVI
 
 
बुधवार, ९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता कन्यकापूजनाचे विशेष आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रुक्मिणी पाडुरंग संस्थान अध्यक्ष न्या. विद्यागौरी खरे भूषविणार आहेत.
 
 
या प्रसंगी तेजस्विनी छात्रावासातील होतकरू तथा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींना भेटवस्तू देऊन समस्त कन्यांचे पूजन मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शनिवार, १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ५.१५ वाजता विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघनाकरिता श्रींची पालखी प्रस्थान करेल आणि आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
 
 
य उपक्रमाकरिता भाविकांनी तन, मन, धनाने योगदान देऊन हा सोहळा यशस्वी करावा असे आवाहन बालाजी देवस्थान मंडळ तथा विश्वस्त मंडळाद्वारे करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0