लोकांची शाळा येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
नागपूर,
Dr. APJ Abdul Kalam लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित पां देव स्मृती लोकांची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. डॉ. कलाम हे मिसाइल मॅन ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ द पीपल ऑफ इंडिया अशा अनेक नावाने देशात आणि जगात ओळखले जातात.विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना तीस विद्यापीठे आणि संस्थांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

vjuydbbn 
 
त्यांच्या स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिन हा शाळेच्या ग्रंथालयात साजरा करण्यात आला. ग्रंथालयातर्फे सर्व विद्यार्थिनींना बुकमार्क तयार करण्याची स्पर्धा तसेच पुस्तकांची निगा या विषयावरती निबंध स्पर्धा अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शाळेच्या ग्रंथपाल डॉ. स्वाती मोहरीर यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग प्रामुख्याने घेतला होता. त्यातून प्रत्येकी वर्गाचे प्रथम दोन विद्यार्थिनीना पारितोषिक वितरण कारण्यात आले. Dr. APJ Abdul Kalam शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी राजूरकर यांनी वाचनाचे महत्त्व तसेच वाचन प्रेरणा दिवस याविषयी मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सुविचार तसेच अवांतर वाचनांतर्गत काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी हर्षिता काळे आणि आभार गौरी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सौजन्य: स्वाती मोहरीर, संपर्क मित्र