इतवारी रेल्वे स्थानकावर स्वच्छता चौपाल

23 Oct 2024 19:23:06
नागपूर,
Itwari Railway Station : भारतीय रेल्वेत सुरू असलेले स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासोबतच प्रवासी व सर्वसामान्यांचाही त्यात सहभाग असावा या दृष्टीने देशभरातील रेल्वे स्थानकांवर 'स्वच्छता चौपाल' आयोजिण्यात येत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावरही स्वच्छता चौपालचे आयोजन करण्यात आले. याला प्रवाशांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त लाभला. या अभियानाचा उद्देश रेल्वे स्थानकांवर स्वच्छता चौपालच्या माध्यमातून 'वेस्ट टू वेल्थ' यासारख्या मुद्यावर अधिक लक्ष देणे हा आहे.
 
 
Itwari Railway Station
 
Itwari Railway Station : याच क्रमात गोंदियानंतर २१ ऑक्टोबरला नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकावर स्वच्छता चौपाल आयोजित करण्यात आले. या विशेष अभियानाअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहिती आणि सेवांमध्ये सुलभता वाढावी तसेच विविध समस्या आणि थेट रेल्वे अधिकार्‍यांसोबत जाणून घेण्यावर भर देण्यात आला. जेणेकरून रेल्वेची सुरक्षितता आणि परिसरात उपलब्ध सुविधांप्रती जागरुकता आणि प्रवाशांसह स्थानिक नागरिकांशी सुविधा व समस्यांची महिती घेऊन भारतीय रेल्वेमध्ये आवश्यकता त्या सुधारणा करणे शक्य होईल. अशाचप्रकारे टप्प्याटप्प्याने नागपूर मंडळातील कामठी, तुमसर रोड, भंडारा रोड, नैनपूर, डोंगरगड, नागभीड आणि छिंदवाडा स्थानकांवरही स्वच्छता आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0