अमरावती,
Ramesh Bundile in amaravati दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षात बुधवारी दुपारी प्रवेश केला आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना युवा स्वाभिमान उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपाला हा धक्का मानला जात आहे. महायुतीतून दर्यापुरातून शिंदे सेनेची माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळताच बुंदीले यांनी पक्ष सोडला आहे.
युवा स्वाभिमानी पार्टीच्या कार्यालयात झालेल्या प्रक्ष प्रवेशादरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दर्यापूर मेळघाट मतदारसंघ हा युवा स्वाभिमानी पक्षाला द्यावे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली होती. मात्र महायुतीतून उमेदवारी मिळालेली अडसूळ हे रवी राणा यांचे कट्टरवैरी मानले जातात. Ramesh Bundile in amaravati अडसूळ यांना उमेदवारी मिळताच युवा स्वाभिमानी पक्ष हा दर्यापूर मतदारसंघातून रमेश बुंदिले यांना उभे करणार असल्याचे मानले जात आहे. बाहेरच पार्सल असलेल्या अभिजीत अडसूळ यांना महायुतीतून शिवसेनेने उमेदवारी दिल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. नवनीत राणा खासदारकीला उभ्या असताना अभिजीत अडसूळ यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे ते म्हणाले.