इस्रायलच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल, पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल

23 Oct 2024 13:36:51
लेबनॉन, 
VIDEO of Israel attack लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलची जोरदार कारवाई सुरूच आहे. इस्रायली सैन्य हिजबुल्लाच्या ठिकाण्याना सतत लक्ष्य करत आहे. इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, गेल्या ४८ तासांत दक्षिण लेबनॉनमध्ये तीन हिजबुल्ला कमांडर आणि सुमारे ७० लढवय्ये मारले गेले. यापूर्वी इस्रायलने दहशतवादी संघटनेचा उत्तराधिकारी हाशेम सफिदीन याला ठार केल्याची पुष्टी केली होती. हेही वाचा : धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा का केली जाते?
 
VIDEO of Israel attack
 
हेही वाचा : धनत्रयोदशीला तयार होणाऱ्या शुभ योगामुळे या 3 राशींना होणार फायदा  
"दक्षिण लेबनॉनमध्ये, आयडीएफ सैन्याने हिजबुल्लाह दहशतवादी संरचना आणि कार्यकर्त्यांविरूद्ध मर्यादित, स्थानिक, लक्ष्यित छापे टाकणे सुरूच ठेवले आहे," इस्त्राईल संरक्षण दल (आयडीएफ) ने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. VIDEO of Israel attack इस्रायलच्या हल्ल्यात एक इमारत कशी जमीनदोस्त होते हे व्हिडिओमध्ये दिसत आहे पण या हल्ल्यात त्याच्या शेजारी असलेल्या इतर इमारतीला काहीही नुकसान झालेले नाही.
 सौजन्य : सोशल मीडिया
इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) दावा केला आहे की दक्षिण लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या जमिनीवरील कारवाईदरम्यान आतापर्यंत 400 हून अधिक हिजबुल्लाहचे कार्यकर्ते मारले गेले आहेत. VIDEO of Israel attack या कार्यकर्त्यांमध्ये अनेक प्रादेशिक कमांडरही सामील आहेत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करून झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे त्यांच्या गटाचा हात असल्याचे दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे मुख्य प्रवक्ते मोहम्मद अफिफ यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0