मॅकडोनाल्डचे बर्गर खाल्ल्याने संसर्ग पसरवल्याचा आरोप

कंपनीने दिली प्रतिक्रिया

    दिनांक :24-Oct-2024
Total Views |
अमेरिका
Macdonald अमेरिकेतील प्रसिद्ध फूड चेन कंपनी मॅकडोनाल्डचे बर्गर खाल्ल्याने E.coli बॅक्टेरिया नावाचा संसर्ग पसरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे तपासकर्ते याची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी. मॅकडोनाल्ड कंपनीनेही या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कंपनीने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की त्यांचे रेस्टॉरंट सुरक्षित आहेत.
 
 
macdonals
 
 
अमेरिकेच्या सेंटर Macdonald फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने मंगळवारी माहिती दिली होती की, मॅकडोनाल्ड बर्गर खाल्ल्याने E.coli बॅक्टेरियाचा संसर्ग पसरला आहे. या संसर्गामुळे ४९ लोक आजारी पडले असून, त्यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. मॅकडोनाल्ड्सने सांगितले की, या घटनेची जाणीव झाल्यानंतर ते फेडरल अन्न सुरक्षा नियामकांशी जवळून काम करत आहे.
मॅकडोनाल्डच्या क्वार्टर पाउंडर Macdonald हॅम्बर्गरमधील कांद्यामुळे हा जिवाणू संसर्ग पसरल्याचा संशय आहे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपांनंतर, क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर मॅकडोनाल्डच्या स्टोअरमधून बॅक्टेरियाने प्रभावित राज्यांच्या काही भागांमध्ये तसेच इतर राज्यांमधून काढून टाकण्यात आले आहे. त्याच वेळी, मॅकडोनाल्ड्सने म्हटले आहे की, ते ताज्या कांद्यासाठी नवीन पुरवठादार शोधत आहेत.