काँग्रेसने वर्धा ठेवले वेटिंग

    दिनांक :24-Oct-2024
Total Views |
वर्धा ,
Maharashtra Assembly Elections : महाविकास आघाडीत आर्वी विधानसभा मतदार संघ कोणाकडे हा घोळ कायम आहे. दरम्यान, आज काँग्रेसच्या पहिल्या यादीत देवळी मतदार संघात आमदार रणजित कांबळे यांना सहाव्यांदा काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे.
 
 
cong
 
 
काँग्रेस मधून प्रभाराव यांच्या कन्या एडवोकेट चारुलता टोकस यांनीही उमेदवारी मागितली होती मात्र अखेर कांबळे यांनाच ही उमेदवारी देण्यात आली आहे.
 
वर्धा विधानसभा मतदारसंघासाठी डॉक्टर सचिन पावडे, शेखर शेंडे, डॉक्टर उदय मेघे यांचे नावं आघाडीवर आहेत. मात्र, पहिल्या यादीत वर्धा वगळण्यात आले. आर्वी मतदार संघवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केला आहे. काँग्रेसकडून मयुरा काळे यांचेही नाव पुढे करण्यात आले असल्याचे कळते.