सरस्वती विद्यालयाला द्वितीय पुरस्कार

24 Oct 2024 14:11:49
नागपूर ,
Saraswati Vidyalaya Nagpur मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कार शैक्षणिक उत्कृष्टता, पायाभूत सुविधांचा विकास, विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोन, सामुदायिक सहभाग आणि एकूणच शालेय वातावरण यासह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या शाळांना मान्यता देते. या पुरस्कारासाठी सरस्वती विद्यालयाची निवड ही दर्जेदार शिक्षण देण्याच्या आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे वातावरण वाढवण्याच्या आणि पोषण देण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ विद्यालय, नागपूर ही महाराष्ट्रातील १३० वर्षे जुनी शैक्षणिक संस्था आहे, Saraswati Vidyalaya Nagpur या संस्थेला मुंबईच्या राष्ट्रीय कला केंद्रात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेला करंडक, द्वितीय क्रमांकाचे प्रमाणपत्र आणि रु. १५,००,०००/- (पंधरा लाख) चा धनादेश हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार वितरण समारंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, यावेळी . आर गणेश (खजिनदार SIES), पुष्पा अनंतनारायण (मुख्याध्यापिका SIES), . रवींद्र कुलकर्णी (पर्यवेक्षक SIES), . आसावरी मास्ते (सहाय्यक शिक्षिका SIES), वैशाली गुजर (शिक्षक प्रतिनिधी SIES) या सर्व माध्यमिक विभागाकडून शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले.
 
 
 
४ ३
 
 
 शिक्षण उपसंचालक, उल्हास नारड, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग. रोहिणी कुंभार,उपशिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, सहाय्यक संचालक, भास्कर झोडे,वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,Saraswati Vidyalaya Nagpur सिद्धेश्वर काळुसे शिक्षणाधिकारी प्राथमिक अमोल अंभोकर,संसाधन व्यक्ती URC-2शुभांगी फुटाणे,विषय तज्ञ शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचा यात मोलाचा वाटा आहे,टी.के. व्यंकटेश (अध्यक्ष SIES), . व्ही. शंकरन (उपाध्यक्ष SIES), . व्ही. मीनाक्षी (मा. सचिव SIES), डॉ.एस. सुंदरम (सह-सचिव SIES), साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे इतर सर्व सदस्य तसेच . लक्ष्मी श्रीनिवासन(उपमुख्याध्यापिका माध्यमिक विभाग) आणि . राहुल घोडे (पर्यवेक्षक माध्यमिक विभाग) यांनी महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
सौजन्य:अनिल देव ,सम्पर्क मित्र
Powered By Sangraha 9.0