दिवसभरात ५२ कोटींची मालमत्ता जप्त

    दिनांक :25-Oct-2024
Total Views |
- बेहिशेबी रकमेची पाळेमुळे शोधा : निवडणूक आयोगाची सूचना
 
मुंबई, 
52 crore property seized  : राज्यात निवडणूक काळात बेहिशेबी रक्कम सापडत असते. या रकमेच्या जप्तीची कारवाई करून स्वस्थ न बसता ही रक्कम नेमकी कोणाकडून कोणाला जाणार होती, याची पाळेमुळे खणून काढण्याच्या सूचना पोलिस तसेच संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.
 
 
Money
 
52 crore property seized  : गुरुवारी एकाच दिवशी ५२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक काळात एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. आचारसंहिता, सोशल मीडिया आदींशी संबंधित प्रकरणांचा त्यात समावेश होता. यापैकी ३०० गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल असून, आता त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
चोपड्यात ३० लाख, नगरमध्ये ७ लाख
मध्यप्रदेशातील बलवाडी येथून जळगावकडे जाणाèया एका वाहनात ३० लाखांची रक्कम आढळून आली. चोपडा येथील तिरंगा चौकात बुधवारी मध्यरात्री या वाहनाची तपासणी केली असता, ही रोकड आढळली. ही रोकड वाहनासह चोपड्यातील महसूल विभागाकडे देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसèया घटनेत अहल्यानगर येथे नगर-पुणे रस्त्यावर कायनेटिक चौकात गुरुवारी पहाटे पुण्याहून जळगावकडे जाणाèया वाहनात सात लाखांची रोकड सापडली.