- माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचे आवाहन
- उत्तरायण प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
नागपूर,
सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणार्या कर विषयक बाबींमध्ये आयकर अधिकार्यांनी आदेश तसेच नोटीस देताना भाषेकडे लक्ष देण अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती Vikas Sirpurkar विकास सिरपूरकर यांनी केले. अधिकारी पदावरून पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांच्या ’उत्तरायण -२०२४’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमीत ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमीचे प्रशिक्षण महासंचालक पी. सेल्वा गणेश, अतिरिक्त महासंचालक मुनीष कुमार, व्ही.व्ही. शर्मा, अभ्यासक्रमाचे प्रभारी महासंचालक आकाश देवांगन प्रामुख्याने उपस्थित होते.
Vikas Sirpurkar : सिरपूरकर पुढे म्हणाले, आयकर अधिकार्यांनी कारकिर्दीमध्ये एकनिष्ठता अभ्यासपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवावा. याप्रसंगी उत्तरायण प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक व्ही .व्ही शर्मा यांनी अहवाल सादर केला. या प्रशिक्षण कार्यक्रमात २० महिला अधिकार्यांसह एकूण १५० पदोन्नत झालेल्या सहाय्यक आयकर आयुक्त अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. प्रशिक्षणार्थी अधिकार्यांनी आपले अनुभव कथन केले. प्रशिक्षणार्थी अधिकार्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सीमा भारती, ऐला श्रीनिवास यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रधान महासंचालकांचे सुवर्णपदक देण्यात आले. उत्तरायण २०२४ च्या अधिकार्यांनी एनएडीटीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा भेट स्वरूपात दिल्या आहेत. अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार यांनी कर्तव्यनिष्ठतेची शपथ अधिकार्यांना दिली.