खून प्रकरणी चार आरोपींना अटक

    दिनांक :25-Oct-2024
Total Views |
वाशीम, 
murder case बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून दोघा मेहुण्यासह एकाने जावयास जिवे मारल्याची घटना वाशीम तालुक्यातील साखरा येथे २३ रोजी घडली. या प्रकरणात वाशीम ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार जांभरुण महाली येथील किसन वसंता महाले व सचिन वसंता महाले यांनी बहीणीचे लग्न साखरा येथील नारायण इंगळे यांच्याशी केले होते.
 

murder case 
 
 
murder case लग्नानंतरचे काही दिवस सुखाचे गेल्यानंतर बहीण जावई नारायण इंगळे आपल्या पत्नीला त्रास देत असल्याचे कळले.बुधवारी सायंकाळी किसन वसंता महाले, सचिन वसंता महाले व अनिल महाले यांनी राजमुद्रा ढाबा येथे नारायण इंगळे याला बेदम मारहाण केली. यामधे नारायण जखमी झाला. मात्र, रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पांडुरंग शिवराम इंगळे रा. साखरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल उर्फ किसना वसंता महाले (वय २७), सचिन वसंता महाले (वय २४), अनिल उर्फ जगदीश परशराम महाले ( वय २०)  हे सर्व रा. जांभरुण महाली व मृतकाची पत्नी शारदा नारायण इंगळे (वय ३८) यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनी श्रीदेवी पाटील पोस्ट वाशीम ग्रामीण करत आहेत.