दिवाळीची खरेदी यात्रा

    दिनांक :27-Oct-2024
Total Views |
- स्वाती पेशवे
Diwali shopping trip : दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. दिवाळी म्हणजे सणांची महाराणी. भारतीय परंपरेमध्ये साधारणत: दर महिन्याला सणावारांची रेलचेल असली, तरीही दिवाळी ती दिवाळीच! एरवी वर्षभर खरेदी होत असली, तरी दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या खरेदीला संपन्नतेचे काही वेगळेच कोंदण असते. ही खरेदी दाराच्या तोरणाबरोबरच बाजारपेठांमधील झगमगाटाने आणि तेथील आकर्षक सजावटीने प्रसन्नतेमध्ये लाखमोलाची भर घालते. थोडक्यात, रोजच्या शिऱ्यामध्ये आणि प्रसादामध्ये असतो तोच फरक नित्याच्या आणि दिवाळीनिमित्त होणाऱ्या खरेदीत असतो, असे म्हणता येईल. म्हणूनच प्रत्येक दिवाळी नावीन्यमयी तशीच प्रत्येक दिवाळीचा बाजारही वैविध्याने भरलेला. चला तर, या दिवाळीत बाजाराचा नूर काय सांगतो, सूर कसा लागतो हे बघू या.
 
 
shoping
 
आताची वेळ समस्त भारतीयांच्या खरेदीच्या उन्मादाची आहे. स्वाभाविकच दरवर्षीप्रमाणे आताही बाजारात ग्राहकांची लगबग वाढलेली दिसते आहे. दिवाळीदरम्यान ग्राहकांच्या वर्तनाचे मुख्य ट्रेंड समजून घेणे प्रत्येक व्यवसायासाठी महत्त्वाचे असते. हा अभ्यास बाजाराबरोबर समाजातील बदलत्या प्रवाहाचे चित्रही समोर मांडतो. त्या अनुषंगाने बघता लक्षात येते की, भारतात ९१ टक्के ग्राहक आता ऑनलाईन खरेदी करतात. त्यामुळेच ग्राहकांना घरबसल्या वा फावल्या वेळेत खरेदीची मुभा देण्यासाठी आणि समाधान वाढविण्यासाठी मोबाईल पेमेंट पर्याय आणि ऑप्टिमाईझ केलेल्या अ‍ॅप्सच्या गरजेवर भर देण्यात येत आहे. मोबाईल केंद्रित ई-कॉमर्सच्या वाढत्या ट्रेंडसह व्यवसायांना अखंड मोबाईल खरेदीचा अनुभव देणे आता आवश्यक आहे. फॅशन, ऑटोमोबाईल आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या विविध क्षेत्रातील आकर्षक ऑ\र आणि सवलतींमुळे दिवाळीच्या खरेदीमध्ये ग्राहकांच्या खर्चात २०-२५ टक्के वाढ होते. याव्यतिरिक्त भारतीय रिटेल क्षेत्राच्या अहवालानुसार ऑगस्ट ते डिसेंबर हे सणासुदीचे महिने वार्षिक विक्रीमध्ये अंदाजे ३०-४० टक्के योगदान देतात, जे व्यवसायांसाठी या कालावधीचे महत्त्व अधोरेखित करतात. ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्यामुळे व्यवसायांना या व्यस्त हंगामाचा फायदा घेण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्रयत्न वाढविणे गरजेचे ठरले आहे. सणासुदीच्या हंगामासाठी प्रभावी धोरणे तयार करण्यासाठी, यासंबंधी व्यवसायांना मार्गदर्शन करण्यासाठी फॅशन, ऑटोमोबाईल आणि ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील अंतर्दृष्टीवर लक्ष केंद्रित करून दिवाळीच्या नवीनतम ट्रेंडची रूपरेषा ठरवली जात असल्याचे दृश्यही यंदा बघायला मिळत आहे.
 
 
Diwali shopping trip : यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेकडे झुकणारा ओढा लक्षणीय म्हणावा लागेल. विशेषत: सणासुदीच्या काळात टिकाऊपणा आणि कनेक्टिव्हिटी हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून खरेदी होताना दिसत आहे. भारतीय किरकोळ उद्योगाने फॅशन आणि दागिन्यांच्या विक्रीत यंदा २०-२५ टक्के वाढ नोंदविली असून पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सचा संगम साधणारी दागिन्यांची श्रेणी ग्राहकांना आकर्षित करताना दिसत आहे. याव्यतिरिक्त तंत्रज्ञानावर आधारित सामग्रीच्या खरेदीमध्ये ३० टक्के वाढ नोंदविली गेली आहे. यातूनच गॅझेट्स आणि स्मार्ट होम डिव्हाईसेसचा वाढता वापर स्पष्ट होतो. या खरेदीवर उत्सवाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो आहे. दिवाळीमध्ये स्वत:साठी खरेदी होते तशीच आप्तस्वकीयांसाठीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. स्वाभाविकच ग्राहक भेटवस्तूंच्या खरेदीकडे मोर्चा वळवतात. यात खाद्यपदार्थ, गृहसजावट, फॅशन आणि जवळपास सर्व प्रकारच्या शॉपिंगमध्ये मोठी उलाढाल अनुभवायला मिळते. आपापले बजेट आणि आवडीनुसार ग्राहकवर्ग आपली भेटवस्तू आकर्षक करण्याच्या प्रयत्नात दिसतो. ही बाबही लोक सणाचा अनुभव सामायिक करण्यास उत्सुक असल्याचे अधोरेखित करून जाते.
 
 
दिवाळी हा दिव्यांचा सण असल्यामुळे दिव्यांचे नानाविध प्रकार भेटवस्तू म्हणून खरेदी करण्याकडे वाढता कल दिसत आहे. त्यासाठी अगदी साध्या धातूपासून चांदी वा त्यासारख्या मौल्यवान मिश्र धातूंच्या आकर्षक दिव्यांची मोठी रेंज बाजारात उपलब्ध आहे. सजावटीचे आकर्षक वेष्टन, मिठाई, पणत्या, रांगोळी आणि आकाशदिवे यासह ते सहर्ष भेट देण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. त्यातही पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याप्रती जागरूकता निर्माण झाल्यामुळे भेटवस्तू निवडताना हे भान राखले जात आहे. अनेक लोक एलईडी दिवे, नैसर्गिक रांगोळी आणि बायोडिग्रेडेबल सजावट निवडतात. भेटवस्तूंची देवाणघेवाण वैयक्तिकृत वस्तूंवरही लक्ष केंद्रित करते. नेहमीप्रमाणे यंदाही विविध प्रकारच्या चॉकलेट्सना मोठी मागणी दिसते आहे. खेरीज दुकानातील खरेदी करण्याबरोबरच कारागिरांकडून मिठाई तयार करण्यास मोठी पसंती मिळताना दिसत आहे. एकंदरच तेलाचे दिवे लावणे, पूजा करणे आणि पारंपरिक पोशाख परिधान करणे यासारख्या जुन्या पद्धती केंद्रस्थानी येऊ लागल्याचा स्पष्ट प्रभाव यंदाच्या साजरीकरणावर आणि खरेदीवर स्पष्ट दिसतोय. उत्सवाला मिळणारे हे सामुदायिक महत्त्व समाजाला नव्या जाणिवेने आणि प्रेरणेने एकत्र आणणारे आहे. म्हणूनच परंपरा आणि आधुनिकतेचे हे मिश्रण दिवाळी साजरे करण्याचे गतिशील स्वरूप प्रतिबिंबित करते, असेही आपण म्हणू शकतो.
 
 
सध्या बरेच वापरकर्ते इन-स्टोअर खरेदीला प्राधान्य देताना दिसत असले, तरीही ते खर्चाच्या सवयींप्रती खूपच संवेदनशील आणि सावध असल्याचे निरीक्षणही तज्ज्ञ नोंदवतात. ग्राहक खरेदी करण्यापूर्वी बचतीला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. एकूणच आर्थिक नियोजन आणि पैशाचे मूल्य यावरचा वाढता भर सूचित करतो की, व्यवसायांनी एक मल्टी-चॅनल मार्केटिंग धोरण अवलंबणे गरजेचे आहे. यामध्ये आकर्षक ऑनलाईन जाहिराती आणि विक्री धोरणांसह आकर्षक फायद्यांचे चित्र समोर मांडणे गरजेचे आहे. यामुळे पारंपरिक खरेदीदार आणि बजेटच्या बाबतीत ठाम भूमिका असणारे ग्राहकही हात मोकळा सोडून खरेदी करण्यास प्रवृत्त होतील.
 
 
Diwali shopping trip : वापरकत्र्याच्या खरेदी आणि खर्च करण्याच्या सवयींबाबत बोलायचे तर ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या २८.७ टक्के इतकी दिसत असून दुकानात खरेदी करायला आवडत असल्याचे मत ३५.६ टक्के ग्राहकांनी नोंदविले आहे. कोणत्याही विक्री योजनेच्या गुंत्यामध्ये वा प्रलोभनांमध्ये न अडकता कोणतेही उत्पादन पूर्ण किमतीत खरेदी करण्यास प्राधान्य असण्याचे मत ६४.४ टक्के ग्राहकांनी नोंदविले आहे तर काहींनी चांगल्या ऑ\रसाठी वाट पाहणे योग्य असल्याचे म्हटले आहे. अशांना विक्रीसाठी थोडी प्रतीक्षा करण्यास काहीही वावगे वाटत नाही. सध्याच्या महागाईच्या काळात घेतलेल्या प्रत्येक वस्तूचे योग्य पद्धतीने जतन करा आणि उत्पादन खरेदी करण्याआधी त्याचा परिपूर्ण होणार असल्याची खात्री करा, असे २४.६ टक्के ग्राहकांचे म्हणणे आहे. त्वरित उत्पादने खरेदी करण्यासाठी इतर खर्चाचा त्याग करण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांचीही संख्या मोठी आहे.
 
 
यंदाच्या सणासुदीच्या काळात दिवाळी थीम असणाऱ्या सामग्रीच्या व्ह्यूजमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही बाजाराचा आढावा घेताना लक्षात येते. वापरकत्र्यांना दिवाळीसारख्या सणानिमित्त सजणाऱ्या प्रमुख खरेदी हंगामात काय खरेदी करण्यात स्वारस्य आहे, याची स्पष्टता असल्याचे दिसते आहे. बाजारात फेरफटका मारताना याचीही झलक दिसते. त्यामुळेच कपडे आणि पोशाख खरेदीदारांच्या सर्वोच्च स्थानावर असताना स्मार्ट फोन वापरकर्ते आवडीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. जवळच्या प्रतिस्पर्धीकडून लॅपटॉप कमी किमतीत मिळत असला, तरी ब्रँडबाबत आग्रही असणारा वर्ग अधिक रक्कम मोजून आपल्या आवडत्या कंपनीची गॅझेटस खरेदी करताना दिसतोय.
 
 
Diwali shopping trip : एका अभ्यासानुसार दिसून आले आहे की, ६४ टक्के ग्राहक अजूनही सुट्टीसाठी टेक गॅझेट खरेदी करण्याची योजना आखत आहेत. दुरस्थ काम आणि व्हच्र्युअल कम्युनिकेशनमध्ये या खरेदीवर भर दिला जाताना दिसत आहे. यंदा मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या उपकरणांची मागणी वाढली आहे. महागाई आणि आर्थिक अनिश्चितता असूनही ग्राहक सणासुदीच्या काळात तंत्रज्ञान खरेदीला प्राधान्य देतात. आर्थिक परिस्थिती ग्राहकांना अधिक सावध बनवू शकते, परंतु प्रीमियम उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा लक्षणीय आहे. ३२ टक्के वापरकर्ते उत्पादनांच्या प्रीमियम आवृत्त्या खरेदी करण्यास प्राधान्य देतात आणि ६५ टक्के उत्पादने खरेदी करण्यापूर्वी ऑनलाईन संशोधन करतात. ही बाबही मूल्यचालित आणि गुणवत्तासजग खरेदी व्यवहारांचे मिश्रण प्रतिबिंबित करणारी आहे. एकंदरीत, या काळात ग्राहक तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेतील मजबूत मागणी काम, दळणवळण आणि करमणुकीसाठी तंत्रज्ञानावरील सततच्या अवलंबनावर प्रकाश टाकते. यामुळे विश्वासार्ह, उच्च गुणवत्तेच्या उपकरणांची गरज वाढते.