पुसद,
महायुती व मित्रपक्षाचे उमेदवार आमदार Indranil Naik इंद्रनील सोमवार, २८ ऑक्टोबरला पुसद उपविभागीय कार्यालयात आपले नामांकन दाखल करणार आहेत. जनतेचा विश्वास जिंकून पुसद विधानसभेत निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासासाठी भक्कम निधी खेचून आणण्यात आ. इंद्रनील नाईकांना यश आले आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा जनमानसामध्ये आहे. लोकनेते मनोहर नाईकसुद्धा Indranil Naik इंद्रनील नाईक यांच्या विजयासाठी सभा घेत आहेत. सोमवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आमदार इंद्रनील नाईक आपले नामांकन दाखल करणार आहेत.