सिंदीरेल्वे
cold climate यंदा ऑक्टोबर महिन्यांच्या गर्मीमुळे बेजार झालेल्यांना महिन्याच्या उत्तरार्धात थंडीची चाहूल जाणवत आहे.दिवाळी थंडी घेऊन आली आहे. नाही तर रबी हंगामाचे काही खरे नव्हते, अशी चर्चा परिसरात होत आहे.
या वर्षी १०३ टक्के पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे सप्टेंबर संपताच थंडी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबरच्या पूर्वार्धात अधूनमधून पावसाचा सपाटा सुरुच होता. त्यामुळे, कोजागरीपर्यंत थंडी जाणवत नव्हती. दिवसभर प्रचंड उकाडा आणि मध्यरात्रीनंतर थोडी उष्णता कमी जाणवत होती. परिणामी, यंदाच्या हिवाळ्यात असेच वातावरण राहिल्यास रबी हंगामाचे काही खरे नाही, असा शेतकरी अंदाज लावत आहे.
परंतु, कोजागरी cold climate झाली आणि हळूहळू थंडी वाढत गेली. मात्र, दिवसा अजूनही उष्णतामान कमी होताना दिसत नाही. सोयाबीनची मळणी झाली जमेल तशी सोयाबीनची विक्री करुन शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहेत. यंदा थंडी वाढल्याने हरभरा किंवा गव्हाचे पीक बहरेल अन्यथा फळबाग वगळता इतर पिकांची शाश्वती नाही, असे पिढीजात शेतकर्यांचे म्हणणे आहे.