man ki bat डिजिटल अरेस्टच्या च्या फ्रॉड मध्ये फोन करणारे कधी पोलिस, कधी सीबीआय ,कधी नार्कोटिक्स कधी आरबीआय,अशी वेगवेगळी लेबल लावून तोतयाअधिकारी बनून बोलतात आणि खूप आत्मविश्वासने ने बोलतात. फ्रॉड करणाऱ्या टोळ्या कसं काम करतात, हा धोकादायक खेळ काय आहे ? तुम्हाला हे समजणे खूप गरजेचं आहे आणि इतरांना समजणेही तेवढंच आवश्यक आहे. पहिला डाव - तुमची सर्व वैयक्तिक माहिती ते जमवतात, तुमच्या परिवाराची माहिती मिळवतात. दुसरा डाव हा भयभीत करुन सोडणे, पोषाख, सरकारी कार्यालयाचा सेटअप कायद्यातली कलमं, बोलता बोलता फोनवर ते तुम्हाला इतकं घाबरवतील की तुम्ही विचारही करु शकणार नाही. आणि मग त्यांचा तिसरा डाव सुरु होतो. तिसरा डाव हा वेळेचा धाक ‘आत्ताच निर्णय घ्यावा लागेल नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल.हे लोक इतका मानसिक दबाव आणतात की ऐकणार पूर्ण घाबरून जातो. डिजिटल अरेस्ट चे बळी सर्व वर्ग आणि सर्व वयोगटातील लोक आहेत.असं तुमच्या सोबत घडू नये याची काळजी घ्या आणि लगेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० डायल करा व cybercrime.gov.in वर रीपोर्ट करा, परिवाराला आणि पोलिसाना सूचित करा, पुरावे सुरक्षित ठेवा. ‘थांबा, ‘विचार करा, आणि मग कृती करा या तीन पायऱ्या आपल्या डिजिटल सुरक्षेच्या रक्षक ठरतील.अशी माहिती मन की बात या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दिली. आज देशवासियांसाठी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, man ki bat ‘ जिथे जिथे कला आहे तिथे तिथे भारत आहे ‘जिथे जिथे संस्कृती आहे तिथे तिथे भारत आहे ‘
आज जगभरातील लोक भारताला आणि भारतातील लोकाना जाणून घेऊ इच्छीत आहेत. म्हणूनच तुम्हा सर्वाना अनुरोध आहे की, आपल्या आसपासच्या अशा सांस्कृतिक घडामोडीना cultural bridges चा भाग करा. ‘मन की बात मध्ये त्यांनी अनेक उदहरणांची आपण पुढेही चर्चा करू असेही म्हटले.
देशातील मोठ्या भागात थंडीचा ऋतु सुरु झाला आहे, पण तंदुरुस्त राहण्याची तीव्र इच्छा, फिट इंडिया चे चैतन्य यांना कोणत्याही ऋतूने काही फरक पडत नाही. ज्याला तंदुरुस्त राहायची सवय असते, तो थंडी, उन्हाळा, पावसाळा पाहत नाही. मला आनंद आहे की, भारतात तंदुरुस्ती बाबत लोक जागरूक होत आहेत. आपल्या आसपासच्या बागामध्ये लोकांची संख्या वाढते आहे हे आपणही पाहतो. पार्क मध्ये फिरत असलेल्या वयोवृद्ध, तरुण आणि योग करणाऱ्या परिवाराना पाहून मला बरे वाटते. जेव्हा मी योगदिनी श्रीनगरला होतो, तेंव्हा पाऊस असूनही कितीतरी लोक योगसाधना करीत होते. आत्ता काही दिवसांपूर्वी श्रीनगर मध्ये जी मॅरेथॉन झाली त्यातही मला तंदुरुस्त राहण्याचा हाच उत्साह दिसून आला. फिट इंडिया ची ही भावना, आता एक सामाजिक चळवळ होत आहे. हे बघूनही बरं वाटते की, आपल्या शाळा मुलांच्या तंदुरुस्ती वर आता आणखी जास्त लक्ष देत आहेत. फिट इंडिया स्कूल
, ‘मन की बात मध्ये यावेळी एवढेच. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवत रहा. हा सणांचा काळ आहे. ‘मन की बातच्या श्रोत्याना धनत्रयोदशी, दिवाळी, छटपूजा, गुरुनानक जयंती आणि सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व पूर्ण उत्साहने सण साजरे करा वोकॅल फॉर लोकलचा मंत्र लक्षात ठेवा, या सणांसाठी तुमच्या घरात स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केलेले सामान येईल असा प्रयत्न करा. सर्वाना सणांसाठी खूप शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाची सांगता केली.
काश्मीरच्या फिरदोसाचा उल्लेख
आपल्या सुलेखनातून काश्मीरला नवी ओळख देणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या फिरदोसा जी यांचा पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. याशिवाय सारंगी वादक आणि चेरियार चित्रकलेचाही उल्लेख केला. त्यांनी छत्तीसगडच्या बटलुराम मथरा जीबद्दलही सांगितले, जे आदिवासींची सभ्यता वाचवण्यासाठी काम करत आहेत. ते म्हणाले की, जगातील विविध लोक भारतीय संस्कृतीने मंत्रमुग्ध होत आहेत. रशियातील कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमच्या नाट्यसादरीकरणाबद्दल सांगितले. जगातील सर्वात थंड शहरात भारतीय साहित्याचा ठसा उमटणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
काश्मीरच्या फिरदोसाचा उल्लेख
आपल्या सुलेखनातून man ki bat काश्मीरला नवी ओळख देणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या फिरदोसा जी यांचा पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. याशिवाय सारंगी वादक आणि चेरियार चित्रकलेचाही उल्लेख केला. त्यांनी छत्तीसगडच्या बटलुराम मथरा जीबद्दलही सांगितले, जे आदिवासींची सभ्यता वाचवण्यासाठी काम करत आहेत. ते म्हणाले की, जगातील विविध लोक भारतीय संस्कृतीने मंत्रमुग्ध होत आहेत. रशियातील कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमच्या नाट्यरूपांतराबद्दलही सांगितले. जगातील सर्वात थंड शहरात भारतीय साहित्याचा ठसा उमटणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.