param sundari movie सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघेही दसवी दिग्दर्शक तुषार जलोटा यांच्या आगामी 'परम सुंदरी' या चित्रपटाचा भाग असणार आहेत. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर त्यांच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, याआधी दोघेही 'स्पायडर' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची बातमी आली होती, पण नंतर दोघेही रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचा भाग बनले. तुषार जलोटा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट दोन भिन्न संस्कृतींच्या लोकांमधील प्रेमकथा दाखवणार आहे. जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ एकत्र दिसणार हा पहिलाच चित्रपट असेल.
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या अभिषेक बच्चनच्या 'दसवी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करून आपला ठसा उमटवणारा तुषार एक वेगळीच कथा घेऊन समोर आला आहे. या चित्रपटाचे शीर्षक ‘परम सुंदरी’ असे असेल. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले असून, सर्वकाही नियोजनानुसार झाले तर डिसेंबरपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, या चित्रपटात सिद्धार्थ एका श्रीमंत उद्योगपतीच्या भूमिकेत आहे आणि जान्हवी एका आधुनिक कलाकाराची भूमिका साकारत आहे.
भिन्न संस्कृतीतील प्रेमकथा
या चित्रपटात सिद्धार्थ param sundari movie उत्तर भारतातील मुलाची भूमिका साकारणार असून, जान्हवी दक्षिण म्हणजेच केरळमधील मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा दोन भिन्न संस्कृतीतील लोकांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री खूपच मजेशीर असणार आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल दिल्लीत सुरू होणार असून, त्यानंतर पुढील शूटिंग केरळमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित शूटिंग मुंबईच्या स्टुडिओमध्ये होणार आहे.
दोन शानदार सेट
शूटिंगसाठी मुंबईत param sundari movie दोन मोठे आणि आलिशान सेट बांधण्याचे काम करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एक सेट दिल्लीच्या पॉश भागात मोठे घर असेल, तर दुसरा सेट केरळच्या पारंपरिक मातीच्या घराचा आतील भाग दाखवेल.नियोजनानुसार, सर्व काही वेळेवर झाले तर हा चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण होईल. याशिवाय 'मुंज्या' आणि 'स्त्री 2' सारख्या चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाईन केलेल्या शीतल शर्मा देखील या प्रोजेक्टसाठी कॉस्ट्यूम डिझायनर असतील.