साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries Zodiac) : उत्तम लाभ
weekly Horoscope : दिवाळीच्या तोंडावर सुरू होणार्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या पंचम या शुभ स्थानातून सुरू होत आहे. पंचमेश रवी आपल्या कुंडलीत सप्तमात आहे. हे जोडीदाराचे स्थान आहे. येथे पराक्रमेश बुधासोबत रवी आहे. या योगामुळे या सप्ताहात आपण बरेच बदल अनुभवू शकाल. हे बदल बव्हंशी लाभकारक ठरणार असल्याने उत्तम लाभ संभवतो. नोकरीत असणार्यांना बोनस, पगारवाढ, पदोन्नती मिळू शकेल, तर व्यवसायाचा विस्तार वगैरे शक्य होऊ शकेल. या सार्यात स्त्री वर्गाची मदत मिळेल. कुटुंबातही जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आपल्या कामाचे कौतुक होईल.
शुभ दिनांक - २८, २९, १, २.
वृषभ (Taurus Zodiac) : विवाहासंबंधी योगांना वेग
दिवाळीच्या ऐन आधी सुरू होणार्या या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या सुख स्थानातून सुरू होत आहे. अशात आपला राशिस्वामी शुक्र सप्तमात व आपल्या राशीत गुरू आहे. या योगामुळे या सप्ताहात वृषभ राशीच्या अनेक युवांना विवाह, प्रेमसंबंध या अनुषंगाने विशेष उपयुक्त योग लाभण्याची शक्यता आहे. त्यांच्या विवाहासंबंधीच्या हालचालींना वेग मिळेल. याशिवाय नोकरी-व्यवसायात उत्तम लाभ संभवतो. आपणास अनुकूल निर्माण होईल. व्यवसायात ज्या लोकांनी अगोदर पुरेशी गुंतवणूक केली आहे, त्यांना आता त्याची चांगली फळे मिळू शकतील.
हेही वाचा : मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर चेंगराचेंगरी, 9 प्रवासी जखमी
शुभ दिनांक - २८, २९, ३०, ३१.
मिथुन (Gemini Zodiac) : पारिवारिक प्रकरणे सांभाळा
weekly Horoscope : दिवाळीच्या आधीच्या या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या तृतीय स्थानातून सुरू होत आहे. त्याची भाग्यावर दृष्टी आहे. अशात राशिस्वामी बुध आठवड्यात षष्ठात रवीसोबत आहे. हे कर्म व विशेषतः नोकरीचे स्थान आहे तसेच हे आरोग्याचेही स्थान आहे. या सप्ताहात आपणास या दोन्ही बाबतीत उपयुक्त संधी लाभू शकतात. नोकरीतील वातावरण चांगले राहील. आरोग्य सुधारेल. दरम्यान, काही पारिवारिक प्रकरणांवरून कुटुंबात क्षणिक तणाव, मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सावध असावे. खर्च वाढल्याने काहीशी ओढाताण निर्माण होईल.
शुभ दिनांक - २९, ३०, ३१, १.
कर्क (Cancer Zodiac) : सुखकर लक्ष्मीयोग, अर्थलाभ
दिवाळीच्या ऐन आधीच्या या आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशिस्वामी चंद्राचे भ्रमण आपल्या धन स्थानातून सुरू होत आहे. कुंडली सदैव हलती ठेवण्याचे काम चंद्र करीत असतो. अशात तो मंगळासोबत आपल्या राशीत येणार असल्याने शुभकर लक्ष्मीयोग बनणार आहे. योग आर्थिक लाभ निश्चित देईल. हा योग स्वभावात काहीशी प्रखरता निर्माण करू शकतो. त्याचा परिणाम व्यावहारिक स्तरावर काही अडचणी निर्माण करणारा असू शकेल. त्यामुळे परिस्थिती पाहून धोरण ठरवावे. कुणाशीही कठोरतेने वागून नुकसान करून घेऊ नये. ही स्थिती प्रकृतीची काजळी घेण्यासही सुचविणारी आहे. आर्थिक स्थिती राहील राहील. हेही वाचा : अरे देवा... नायब तहसीलदाराची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या, video
शुभ दिनांक - ३१, १, २.
सिंह (Leo Zodiac) : बोलून कुणास दुखवू नका
weekly Horoscope : दिवाळीच्या तोंडावर सुरू होणार्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्याच राशी स्थानातून सुरू होत आहे. अशात राशिस्वामी रवी लाभेश बुधासोबत तृतीयात आहे. या योगाचा पुरेपूर लाभ नोकरी-व्यवसायातील प्रगतीच्या रूपात मिळणार आहे. नोकरी-व्यवसायात चांगले घटनाक्रम अनुभवास येतील. या सप्ताहात खर्चवृद्धीचेही प्रबळ योग दिसत त्यामुळे खर्चावर नियंत्रण हवे तसेच अनावश्यक संताप, रागीटपणा वाढू देऊ नये. या आठवड्यात बोलण्यावर अतिशय नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार तर नाही, याची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक - २७, २९, ३०, २.
कन्या (Virgo Zodiac) : खर्चवाढ, खिसा सांभाळा
दिवाळीच्या आधीच्या या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या व्यय सुरू होत आहे. अशात राशिस्वामी बुध धन स्थानात व्ययेश रवीसोबत आहे. त्यामुळे या आठवड्यात आपणास बरेच खर्चिक योग लाभण्याची शक्यता आहे. खिसा सांभाळावयास हवा. सरकार दरबारी, बँकांमध्ये रेंगाळत पडलेली कामे आता वेग घेऊन व पूर्णत्वास जाऊ शकतील. यामुळे आपल्या योजना, नवे उपक्रम मार्गी लावता येऊ शकतील. व्यवसायाचा विस्तार, नवीन ही वेळ उपयुक्त ठरावी. आपण श्रम व पैसा या दृष्टीने केलेली कोणतीही गुंतवणूक फलदायी ठरेल.
शुभ दिनांक - २८, ३०, ३१, १.
तूळ (Libra Zodiac) : वेगळ्या कल्पनांमधून यश
weekly Horoscope : दिवाळीच्या ऐन तोंडावर सुरू होणार्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या लाभ स्थानातून सुरू होत आहे. अशातच आपला राशिस्वामी शुक्र धनस्थानात आहे. त्याच्यावर उत्तम दृष्टी आहे. यामुळे या सप्ताहात आपणास अर्थलाभाचे उत्तम योग यावेत. नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग लाभावा. आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायातील नकारात्मक वादळ दूर झालेले आढळेल. प्रसार- प्रचाराच्या क्षेत्रात असणार्यांना वेगळ्या कल्पना राबवून यशस्वी करून दाखविता येतील. युवा वर्गाला विवाहाच्या संबंधाने उत्तम योग लाभून जीवनाचा जोडीदार शोधता येईल.
शुभ - २७, २८, ३१, २.
वृश्चिक (Scorpio Zodiac) : कर्तृत्वाची चुणूक दिसेल
दिवाळीच्या सणापूर्वीच्या या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या दशम या कर्म स्थानातून सुरू होत आहे. अशात आपला राशिस्वामी मंगळ भाग्य स्थानात आहे तर राशीत असलेला शुक्र गुरूच्या दृष्टीने सुखावला आहे. तो शुभता प्रदान करीत आहे. या एकंदर ग्रहस्थितीचे चांगले आपणास या सप्ताहात उपभोगता येऊ शकतील. काही अनपेक्षित लाभ अचानक होऊन आनंद द्विगुणीत करू शकतात. हा काळ आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविणारा राहील. कुटुंबीय व मित्रवर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. काहींचा नोकरीत भाग्योदय होऊ शकतो. व्यवसायातील मंडळींना कार्यकक्षा वाढवता येईल.
शुभ दिनांक - २८, १, २, ३.
धनु (Sagittarius Zodiac) : अर्थलाभास अनुकूल, भाग्यकारक
दिवाळीच्या या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या भाग्य स्थानातून सुरू होत आहे. राशिस्वामी गुरू षष्ठ या कर्मस्थानात आहे. हा नोकरी आणि व्यवसायादी कर्मस्थानाला बळकटी देणारा योग आहे. ही ग्रहस्थिती पाहता हा आठवडा अर्थलाभास अनुकूल व भाग्यकारक ठरणार आहे. नोकरी, व्यवसायातून अचानक अर्थप्राप्तीचे योग लाभण्याची शक्यता आहे. यामुळे कुटुंबात, व्यवसायात, मित्रवर्गात आनंद व समाधानाचे वातावरण राहील. युवावर्गालाही चांगले योग लाभावेत. विवाहादी संबंधाने युवा वर्गास चांगल्या संधी मिळतील.
शुभ दिनांक - २७, २९, ३०, २.
मकर (Capricorn Zodiac) : योजनाबद्ध आगेकूच करा
weekly Horoscope : दिवाळीच्या ऐन तोंडावर सुरू होणार्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या अष्टम या पीडादायक स्थानातून सुरू होत आहे. मात्र, राशिस्वामी शनी स्वराशीत बलवान असल्याने व राशीवर गुरूची शुभ दृष्टी असल्याने पीडादायक प्रभाव निष्प्रभ होतील. त्यामुळे हा सप्ताह उत्साह, उत्तमपैकी आरोग्य व धडाडी देण्याची शक्यता आहे. सुरुवातीला काहीसा खर्च करावा लागू शकता. त्याची उपयोगिता व चांगली फळे आपणास लाभान्वित करू शकतात. आपली कामे वेगाने पूर्णत्वास जाणार असल्याने योजनाबद्धपणे आगेकूच करू शकता. आपले कुटुंबीय, मित्रमंडळ, सहकारी यांची उत्तम साथ मिळेल.
शुभ दिनांक - २७, २९, ३०, ३१.
कुंभ (Aquarius Zodiac) : आसपास प्रतिकूल वातावरण
दिवाळीच्या ऐन तोंडावर सुरू होणार्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या सप्तम या जोडीदाराच्या स्थानातून सुरू होत आहे. अशात राशिस्वामी शनी राशिस्थानात बलवान आहे. सध्या साडेसाती सुरू असली, तरी राशिस्वामीचे असणे ही आपल्यासाठी आनंदाची पर्वणीचआहे. मात्र अशातच राशीवर शत्रुस्थानातून येणारी मंगळाची अशुभ दृष्टी आपल्या आसपासचे वातावरण काहीसे प्रतिकूल असल्याचे सुतोवाच करीत आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात गाफील राहू नये. वाईट संगतीत व्यसनांची वृद्धी होण्याचाही धोका आहे. हे सारे पाहता खंबीर भूमिका घेऊन वागण्याचे धोरण अवलंबिणे क्रमप्राप्त आहे.
शुभ दिनांक - ३१, १, २.
मीन (Pisces Zodiac) : आरोग्य जपले पाहिजे
weekly Horoscope : दिवाळीच्या सणापूर्वीच्या या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या षष्ठ या कर्म व अनारोग्याच्या स्थानातून सुरू होत आहे. अशात आपला राशिस्वामी गुरू पराक्रम स्थानात आहे तर राशीत असलेला राहू संभ्रमाची स्थिती निर्माण करीत आहे. राहूचे हे असणे आरोग्यासाठी प्रतिकूल स्थिती निर्माण करीत त्यामुळे आरोग्य राखून आपल्या योजना व काही उपक्रम पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतील. आपल्या अनारोग्याचा परिणाम आपल्या व्यावसायिक जबाबदारीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. युवावर्गास काही अचानक संधी लाभू शकतात. या राशीच्या ज्येष्ठ मंडळींनी आपले आरोग्य जपले पाहिजे.
शुभ दिनांक - २८, ३१, १, २.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष ८६००१०५७४६