- रेल्वेने अतिरिक्त ६ काउंटर उघडले
नागपूर,
मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर Ticket booking counter तिकीट बुकिंग काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने अतिरिक्त ६ काउंटर उघडले आहे. तसेच युटीएस तिकीट काउंटरची संख्या ७ करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली. दिवाळी आणि छट पूजेकरिता उत्तर प्रदेशात जाण्यासाठी रविवारी वांद्रे टर्मिनसमध्ये गर्दी झाली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ९ प्रवासी जखमी झाले. या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
(संग्रहित छायाचित्र )
Ticket booking counter : नागपूर मुख्य स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि वाणिज्य विभागाचे कर्मचारी-अधिकारी बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे. स्थानकावर अशाच गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. नागपुरातून सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागपूर मुख्य स्थानकावर त्याची पुनरावृत्ती होऊन नये म्हणून ही विशेष दक्षता घेण्यात आली आहे. चोरट्यांना आवर घालण्यासाठी साध्यावेशातही पोलिस कर्मचारी नियुक्त आहेत. गाड्यांमध्ये चेकिंग वाढविण्यात आली आहे.