- माजी मंत्री अनिस अहमद केवळ एक मिनिट उशिरा पोहोचले
नागपूर,
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी मंगळवारी दुपारी ३ वाजता केवळ एक मिनिट उशिर झाल्याने माजी मंत्री Anis Ahmed अनिस अहमद उमेदवारी अर्ज भरता आला नाही. माजी मंत्री व काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अनिस अहमद यांनी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेतला होता. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनिस अहमद आपल्या चार चाकी कारव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र, एक मिनिट उशिर झाल्याने निवडणूक अधिकार्यांनी भरण्याची वेळ झाल्याने आपणास आता अर्ज भरता येणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर आपला अर्ज घ्यायला हवा होता. तो नाकारून आपल्यावर निवडणूक अधिकार्यांनी अन्याय केल्याचा आरोप माजी मंत्री Anis Ahmed अनिस अहमद यांनी केला आहे. अनिस अहमद यांनी पाचवेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. तेव्हा त्यांची वेळ चुकलीच नव्हती. परंतू आजच वेळ कशी चुकली ? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केल्या जात आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम आणि बहुल असून मुस्लिमांना उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने मुस्लिम आणि हलबा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.