'भाबीजी घर पर हैं' सर्वात लोकप्रिय शो कसा बनला?

निर्मात्याने गुपिते उघड केली

    दिनांक :29-Oct-2024
Total Views |
Binaifer Kohli 'भाबीजी घर पर हैं'ची निर्माती बिनाफर कोहलीने हिने एका वृत्तपत्राद्वारे बातचीत केली.तिने सांगितले की, त्या शो मधील सर्व पात्रे खरी आणि निरागस आहेत. शो च्या टीममधील लोक तिच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करत आहेत. सेटवरील वातावरण एका कुटुंबासारखे आहे. 'भाबीजी घर पर हैं' हा टीव्ही शो जगतातील सर्वात लोकप्रिय शो आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. या शो ची संपूर्ण स्टार कास्ट चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 
 
  
comedy show
 
शोमधील प्रत्येक पात्र खास
'भाबीजी घर पर हैं' ची Binaifer Kohli निर्माती बेनाफर कोहली यांनी खास बातचीत केली. यादरम्यान, बिनाफर कोहलीने स्टारकास्ट व मालिकेच्या कथेबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. ती म्हणाली, आम्ही बनवलेल्या सर्व कॉमेडी मालिकांमध्ये आयकॉनिक पात्र आहेत. मात्र, यात माझ्यापेक्षा माझे पती संजय कोहलीचे योगदान जास्त आहे. माझे पती कॉमेडीचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी उत्तम कॉमेडी शो तयार केले आहेत. 'भाबीजी घर पर हैं' बद्दल बोलताना बिनाफर कोहली म्हणाली, या शोमधील पात्रे अगदी खरी आहेत.
जर कोणी कंजूष असेल तर तो कंजूष म्हणून दाखवला जातो. जर कोणी पागल असेल तर त्याला पागल म्हणून पाहिले जाते, जर कोणी हुशार असेल तर त्याला स्मार्ट म्हणून दाखवले जाते. सर्व पात्रे खरी आणि अगदी निरागस आहेत.
वेळेवर पैसे द्या
बिनाफर म्हणाली,आमचे Binaifer Kohli कलाकार १७ वर्षांपासून आमच्यासोबत काम करत आहेत. तंत्रज्ञ- कॅमेरामन ३०-३२ वर्षांपासून कार्यरत आहे. याचे एक कारण म्हणजे, आम्ही पेमेंट नेहमी वेळेवर करतो. गुरुवारचा पेमेंट बुधवारी एक दिवस आधी येऊ शकतो.परंतु, शुक्रवारी एक दिवस उशिरा येत नाही. त्यामुळे, सेटवरचं वातावरण खूप चांगलं असतं. सेटवर प्रत्येकजण कुटुंबाप्रमाणे काम करतो. प्रत्येकजण आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित करतो. हा शो १० वर्षांपासून सुरू आहे. सर्व एपिसोड नवीन आहेत, ते कधीही रिपीट होत नाहीत. आमच्या शोमध्ये आम्ही महिलांना उच्च स्थानावर ठेवतो. दोन स्त्रिया एकमेकांना आधार देतात व मैत्रिणी होतात.
 
अंगूरी भाभी ज्याप्रकारे बाईक चालवायला शिकल्या, त्यावरून कोणत्याही महिलेला वाटेल की तीही ते करू शकते. या शोच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिले जाते. हिट कॉमेडी शो बनवण्याबाबत बिनाफर म्हणाली,कॉमेडी शो बनवण्याआधी तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. डेली सोप शो बनवणारे बरेच लोक आहेत, पण कॉमेडी शो बनवणारे फार कमी.