आयुर्वेदाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज

    दिनांक :29-Oct-2024
Total Views |
- पद्मश्री डॉ. विकास महात्मे
- राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम
 
नागपूर,
सर्वांगीण आरोग्यावर भर देणारे आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. केंद्र सरकारने आयुर्वेद दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला देशविदेशात पोहोचविले आयुर्वेदाबद्दल असलेले गैरसमज दूर करीत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एम्सचे अध्यक्ष व Dr. Vikas Mahatme  पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले.
 
 
arogya-bharati
 
आरोग्य भारती व आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीने हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात आयोजित कार्यक्रमात एम्सचे अध्यक्ष व पद्मश्री डॉ. विकास महात्मे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मुख्य वक्ते श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मृत्युंजय शर्मा, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध मुर्‍हार, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत वणीकर, डॉ.रमेश गौतम उपस्थित होते.
 
 
जीवनशैलीबद्दल मौलिक मार्गदर्शन
Dr. Vikas Mahatme  : डॉ.महात्मे पुढे म्हणाले, आयुर्वेद म्हणजे आपल्या निरोगी जीवनाचे ज्ञान होय. आयुर्वेदिक तत्त्वे, औषधी वनस्पती आणि जीवनशैली यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा म्हणजेच नागरिकांचे आरोग्य ठणठणीत बरे करणे होय. उपप्राचार्य डॉ. मृत्युंजय शर्मा यांनी आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांबद्दल, उपचार पद्धतींबद्दल आणि जीवनशैलीबद्दल मौलिक मार्गदर्शन केले.
 
 
धन्वंतरी जयंती, भारतीय आरोग्य दिन आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय वैद्यकीय समन्वय समितीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. गोविंद प्रसाद उपाध्याय, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अडातिया, दत्ता मेघे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हर्षला शर्मा, योग विशेषज्ञ डॉ. स्मिता प्रकाश ढोबळे, आयुर्वेद व्यासपीठ विदर्भ प्रांतचे सहकार्यवाह डॉ. हितेंद्र मैंद, विठोबा हेल्थकेअर अँड रिसर्च प्रा. लि.चे कार्यकारी संचालक सुदर्शन एकनाथ शेंडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुरज पिसे, बडगे, प्रफुल्ल फडणवीस, समीर गिरडे, निलम गिरी आदींनी परिश्रम घेतले. संचालन आशिष कोल्हे यांनी केले. तर आभार अशोक गव्हाणे यांनी मानले.